मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /एकनाथ खडसेंनी वापरलं इस्त्रायल तंत्रज्ञान, शेतात घेतलं दुधी भोपळ्याचं पिक!

एकनाथ खडसेंनी वापरलं इस्त्रायल तंत्रज्ञान, शेतात घेतलं दुधी भोपळ्याचं पिक!

राजकीय क्षेत्रात काम करत असताना मला वेळ कमी मिळतो. कारण कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सतत सुरू असतात. तरी देखील मी मुळचा शेतकरी आहे.

राजकीय क्षेत्रात काम करत असताना मला वेळ कमी मिळतो. कारण कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सतत सुरू असतात. तरी देखील मी मुळचा शेतकरी आहे.

राजकीय क्षेत्रात काम करत असताना मला वेळ कमी मिळतो. कारण कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सतत सुरू असतात. तरी देखील मी मुळचा शेतकरी आहे.

इम्तियाज अहमद, प्रतिनिधी

जळगाव, 04 जानेवारी : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या शेतात सध्या दुधी भोपळ्याचं मोठं पिक आलंय. त्यासाठी त्यांनी इस्त्रायल तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

ही दुधी भोपळ्याची शेती आहे भाजप नेते  एकनाथ खडसे यांची. एका भोपळ्याच्या लांबी साडेचार ते सहा फुटांपर्यंत असून इस्त्रायल तंत्रज्ञानाचा वापर करुन खडसे यांनी  दुधी भोपळ्याची लागवड केली. त्यामुळं यंदा त्यांना चांगलं उत्पादन झालंय. गेल्या तीन वर्षांपासून खडसे आपल्या शेतात दुधी भोपळ्याचं पीक घेत आहेत.

राजकीय क्षेत्रात काम करत असताना मला वेळ कमी मिळतो. कारण कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सतत सुरू असतात. तरी देखील मी मुळचा शेतकरी असल्याने मी शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करीत असतो, असं एकनाथर खडसे यांनी म्हटलं आहे.

माझ्या शेतामध्ये इस्त्रायलचे माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून दुधी भोपळा मी लावलेले आहे. ते कमीत कमी साडेचार ते सहा फुटापर्यंत वाढलेले आहे. त्यातून ज्युस काढणे सुरू आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यानंतर सिटलेस जांभुळ, तसेच पंधरा एकर शेती मध्ये मी खजुराची लागवड केली असून 34 एक एकर शेतीमध्ये देखील खजुराची लागवड केली आहे. महाराष्ट्रमध्ये मी प्रथमच लागवड केली असल्याचा दावाही खडसे यांनी केला आहे. मी वेगवेगळे प्रयोग करून विविध पद्धतीचे भाजीपाल्याची लागवड करीत असल्याचंही एकनाथ खडसे यांनी यावेळी म्हटलं आहे.

शेती पारंपरीक पद्धतीनं करण्याऐवजी तिला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास ती  फायदेशीर होते. मात्र, त्यासाठी शेतकऱ्यांनी नवनवे प्रयोग करण्याची आवश्यकता आहे.

First published:
top videos

    Tags: BJP, Eknath khadse, Jalgaon