मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /माझं नाव घेण्यासाठी पोलिसांवर दबाव, मला रात्रभर..; खडसेंचा सरकारवर गंभीर आरोप

माझं नाव घेण्यासाठी पोलिसांवर दबाव, मला रात्रभर..; खडसेंचा सरकारवर गंभीर आरोप

एकनाथ खडसेंचा सरकारवर गंभीर आरोप

एकनाथ खडसेंचा सरकारवर गंभीर आरोप

राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करताना त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 25 मार्च :  राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करताना त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. तसेच अनिक्षा जयसिंघानियाच्या इतक्या दिवस संपर्कात होते ते कसं चाललं असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीस यांना देखील टोला लगावला आहे. माझ्या मागे एसआटी लावली, सरकारकडून विरोधकांना छळण्याचं काम सुरू असल्याचंही खडसे यांनी यावेळी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले खडसे?

एकनाथ खडसे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. माझ्या मागे एसआटी लावली, माझ्यावर जेवढ्या काही केस दाखल आहेत त्या सर्व खोट्या आहेत. माझं नाव घेण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला जात आहे.  मला रात्रभर आंदोलन करावं लागलं, पण अजूनही गुन्हा नोंदवला नाही. राज्यात विरोधकांना छळण्याचं काम सुरू आहे. एक जण बोलला की खडसे कुटुंबावर गुन्हे दाखल होणार आहेत, हे राज्यात काय सुरू आहे? असा सवाल एकनाथ खडसे यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तसेच काही लोक म्हणतात तुम्ही देशद्रोह्यांसोबत बसता, असं कोणी कसं म्हणून शकतं?  मग अनिक्षा जयसिंघानियाच्या इतक्या दिवस संपर्कात होते ते कसं चाललं असं म्हणत खडसे यांनी फडणवीसांना देखील अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

राजू शेट्टींचा टोला  

दरम्या दुसरीकडे शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी देखील राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर भाजपला टोला लगावला आहे. तुम्ही सत्तेत आहात त्यामुळे तुम्ही यंत्रणाचा वापर करता. मात्र तुम्ही देखील विरोधी पक्षात जाणार आहात तेव्हा तुमचीही अशीच अवस्था होईल असं शेट्टी यांनी म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: BJP, Eknath khadse, NCP