मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'शिंदे कानात सांगतात, 50 खोके घेतले आहेत ना, मग कशाला हवं मंत्रीपद?'

'शिंदे कानात सांगतात, 50 खोके घेतले आहेत ना, मग कशाला हवं मंत्रीपद?'

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

"मंत्रीपद मिळण्याबाबत आपसातल्या भानगडीमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाहीय. आता जर मंत्रिमंडळाचा विस्तार केला तर दुसऱ्या दिवशी हे सरकार कोसळेल", असा धक्कादायक दावा करण्यात आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalgaon, India
  • Published by:  Chetan Patil

नितीन नांदुरकर, जळगाव, 2 ऑक्टोबर : राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार स्थापन होऊन तीन महिने होत आली. नव्या सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार व्हायला एक महिना उशिर झाला होता. मंत्रिमंडळाच्या विस्तारावरुन विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला होता. त्यानंतर मंत्रिमंडळाचा पहिल्या टप्प्यातील विस्तार झाला होता. पण दुसऱ्या टप्प्यातील विस्तार अद्यापही झालेला नाही. त्यामुळे सरकारवर वारंवार विरोधकांकडून निशाणा साधला जातोय. मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार झाला तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी हे सरकार कोसळेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. तसेच एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांना कानात 50 खोके घेतले आहेत ना, मग कशाला हवं मंत्रीपद? असं सांगत असल्याचा धक्कादायक दावा देखील एकनाथ खडसे यांनी केला आहे.

"मंत्रीपद मिळण्याबाबत आपसातल्या भानगडीमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाहीय. आता जर मंत्रिमंडळाचा विस्तार केला तर दुसऱ्या दिवशी हे सरकार कोसळेल. त्यामुळे हे सरकार कोसळण्याचीवेळ येईल त्याच्या महिनाभर अगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल", असा घणाघात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा-भडगाव मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेच्या उद्घाटन कार्यक्रमात एकनाथ खडसे बोलत होते.

(...दुसरं कोणी होणे नाही, महात्मा गांधींबद्दल राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत)

जळगाव जिल्ह्यातील शिंदे गटात गेलेल्या पाच आमदारांमध्येच मंत्रीपदासाठी रस्सीखेच असल्याची टीका यावेळी एकनाथ खडसे यांनी केली. "मंत्री पदासाठी सुरुवातीला अनेक गाड्या भरून मुंबईकडे गेल्या. मात्र आता पन्नास खोके घेतले आहेत. मग कशाला पाहिजे मंत्रीपद? असे एकनाथ शिंदे त्यांच्या कानात संगात आहेत. त्यामुळे आता सर्व गुपचूप बसले आहेत", अशी खोचक टीकाही एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारवर केली आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारावरुन टीका करण्याची ही खडसे यांची आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची पहिली वेळ नाही. याआधीदेखील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अनेकदा शिंदे गट आणि भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातील पालकमंत्र्यांची यादी गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आली. सरकार स्थापन झाल्यानंतर पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात उशिर झाला हे सत्य असलं तरी त्या यादीवरुनही विरोधकांनी सरकावर निशाणा साधला. कारण एकाच मंत्र्याकडे तब्बल सहा जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांना सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. पण दुसऱ्या टप्प्यातील मत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर कदाचित फडणवीस यांच्यावर सोपवण्यात आलेल्या उर्वरित जिल्ह्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांवर सोपवली जाण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: BJP, Eknath khadse, Eknath Shinde, Shiv sena