मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिंदे-भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर खडसेंचा फडणवीसांवर पहिला वार, म्हणाले....

शिंदे-भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर खडसेंचा फडणवीसांवर पहिला वार, म्हणाले....

एकनाथ खडसे आणि फडणवीस यांच्यातील राजकीय वाकयुद्ध हे सर्वश्रूत असं आहे. एकनाथ खडसे भाजपात असतानाही त्यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळाला होता. आता तर खडसे आणि फडणवीस हे वेगवेगळ्या पक्षात आहेत.

एकनाथ खडसे आणि फडणवीस यांच्यातील राजकीय वाकयुद्ध हे सर्वश्रूत असं आहे. एकनाथ खडसे भाजपात असतानाही त्यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळाला होता. आता तर खडसे आणि फडणवीस हे वेगवेगळ्या पक्षात आहेत.

एकनाथ खडसे आणि फडणवीस यांच्यातील राजकीय वाकयुद्ध हे सर्वश्रूत असं आहे. एकनाथ खडसे भाजपात असतानाही त्यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळाला होता. आता तर खडसे आणि फडणवीस हे वेगवेगळ्या पक्षात आहेत.

  • Published by:  Chetan Patil

जळगाव, 15 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेतील एक कृती चांगलीच चर्चेत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे पत्रकारांशी संवाद साधत असताना चिठ्ठीवर लिहून संभाषण करण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता. या प्रकारावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या संबंधित कृतीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीदेखील टीका केली. तसेच अनेकांनी या कृतीवर टीका केली. विशेष म्हणजे फडणवीस यांच्या या कृतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनीसुद्धा टीका केली. एकनाथ खडसे आणि फडणवीस यांच्यातील राजकीय वाकयुद्ध हे सर्वश्रूत असं आहे. एकनाथ खडसे भाजपात असतानाही त्यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळाला होता. आता तर खडसे आणि फडणवीस हे वेगवेगळ्या पक्षात आहेत. त्यामुळे खडसे यांनी फडणवीस यांना त्यांच्या कालच्या कृतीवरुन थेट शिंदे सरकारचा रिमोट कुणाकडे आहे? असा सवाल केला.

"देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत शिंदेंना चिठ्ठी लिहून दिली. या गोष्टी नेमक्या एकमेकांना मदत करण्यासाठी घडत आहेत, की एकमेकांचा इगो जपण्यासाठी, हे आता सांगता येणार नाही. शिंदे गट आणि भाजप युतीतील सरकार पूर्ण क्षमतेने चालेल, त्यावेळेस नेमकं सांगता येईल, की कोण कोणाच्या इशाऱ्यावरून चाललंय", असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला.

(ठाकरेंचं ठरलं! बहुमत आमच्याकडं विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेनेचे उपाध्यक्षांना पत्र)

"हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सहभागी, तर मंत्रिपद कशाला हवं? शिंदे गटात सहभागी झालेले आमदार नेमके हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सरकारमध्ये सहभागी झाले आहेत की त्याला इतर काही कारणे आहेत, हे नेमकं कळत नाही. मात्र जर हे आमदार हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे गटात सहभागी झाले असतील तर त्यांना आता मंत्रिपद मागण्याचं कुठलंही कारण नाही. यांनी हिंदुत्वासाठीच लढावं", असा टोला एकनाथ खडसे यांनी शिंदे गटाला जाऊन मिळालेला आमदारांना उद्देशून लगावला आहे.

एकनाथ खडसे यांची भाजपवर टीका

"कुठल्याही पद्धतीने सुपारी घेऊन नव्हे तर भाजपनेच नवीन डाव खेळून हे सरकार पाडलं. तीन पक्षांचं सरकार असतानाही उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्ष सरकार चांगल्या पद्धतीने सांभाळलं. भाजपने ज्या पद्धतीने रिकामे उद्योग करून हे सरकार बाजूला केलं, ही बाब जनतेला रुचलेली नाही", अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली.

देवेंद्र फडणवीस त्यांच्या 'त्या' कृतीवरुन माध्यमांवरच भडकले

देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंना चिठ्ठी लिहून दिल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं होतं. तसेच फडणवीस यांनी शिंदेंकडून माईक ओढल्याचं देखील बघायला मिळाल्याचा दावा केला जात होता. पण या घटनेची बातमी प्रसारित केली म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांवरच टीका केली. विशेष म्हणजे फडणवीस यांनी काल भर पत्रकार परिषदेत केलेल्या संबंधित कृतीवरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीसुद्धा टीका केली होती. त्यानंतर अनेकांकडून या कृतीची दखल घेतली गेली होती. पण फडणवीसांनी त्यांच्या या कृतीवरु माध्यमांवर टीका केली.

"अलिकडच्या काळात माध्यमांकडे बातम्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे डेस्कवर बसून बातम्या लिहिण्याचा एक धंदा सुरु झाला. त्याच्यातच मनसे नेते अमित ठाकरेंना मंत्रीपद देणार, मी माईक ओढून घेतला, अशा बातम्या दाखवल्या जात आहेत. आपल्यापैकी अनेकजण त्या पत्रकार परिषदेत होते. पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर एकनाथ शिंदे उत्तर देत होते. त्यावेळी पत्रकाराने सांगितलं की, तुम्हाला नाही तर हा प्रश्न उपमुख्यमंत्र्यांना विचारला आहे. म्हणून तो माईक मी घेतला. पण ते म्यूट करुन दाखवणे. माझ्या मुख्यमंत्र्याला एखादी चिठ्ठी मी लिहिली तर त्यात गैर काय? अलिकडच्या काळात तुमच्याकडे बातम्या कमी पडत आहेत, असं मला वाटतंय", अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.

अजित पवारांचा टोला

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या कृतीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निशाणा साधला होता. "आम्ही सत्तेत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मी आम्ही परस्परांचा मान ठेवला आहे. पण आता इथे उपमुख्यमंत्रीच मुख्यमंत्र्यांचा माईक खेचत आहेत. नावं घेण्यावरुन मानपान सुरुय. नावं घेताना एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या धैर्यशील माने यांचं नाव घेतलं. आबिटकर, राजेश क्षीरसागर यांचं नाव घेतलं. पण धनंजय महाडिक यांचं नाव घेतलं नाही. म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी चिठ्ठीवर नाव लिहून दिलं. पण अशा गोष्टी करु नयेत. कारण मीडियाच्या कॅमेऱ्यांचं बारकाईनं लक्ष असतं. ही तर सुरुवात आहे. सुरुवातीलाच अशी ओढाओढ, चिठ्ठा देणं सुरु झालं तर पुढे काय होणार हे महाराष्ट्राने पाहावं", असा टोला अजित पवारांनी लगावला.

First published:

Tags: BJP, Eknath khadse, Eknath Shinde