पाय बरा नाही म्हणून संघाच्या कार्यशाळेस गेलो नाही-एकनाथ खडसे

पाय बरा नाही म्हणून संघाच्या कार्यशाळेस गेलो नाही-एकनाथ खडसे

गेल्या काही दिवसांपासून पक्षाावर खडसे नाराज असल्याची चर्चा आहे. तसंच एकनाथ खडसे विस्थापित नाहीत त्यामुळे त्यांना पुन्हा मंत्रिपद देण्याचा सवालच नाही असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं होतं.

  • Share this:

20 डिसेंबर:  नागपूरमध्ये आज भाजप आमदारांसाठी संघाची कार्यशाळा सुरू आहे.  त्याला एकनाथ खडसेंनी दांडी मारली. पण माझा पाय बरा नसल्यामुळे मी गेलो नाही, माझ्यावर उपचार सुरू आहेत, अशी एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया खडसेंनी न्यूज१८ लोकमतला दिली आहे.

आज राज्यातील सर्व आमदार आणि मंत्र्यांची आज संघ मुख्यालयात शाळा भरवली जाते आहे. या कार्यशाळेला फक्त दोन आमदार आलेले नाहीत. एक म्हणजे एकनाथ खडसे आणि दुसरे आशीष देशमुख. गेल्या काही दिवसांपासून पक्षाावर खडसे नाराज असल्याची चर्चा आहे. तसंच एकनाथ खडसे विस्थापित नाहीत त्यामुळे त्यांना पुन्हा मंत्रिपद देण्याचा सवालच नाही असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं होतं. त्यातच नारायण राणेंना मंत्रिपद मिळण्याची चर्चा आहे. त्यामुळे खडसे या बैठकीस गेल नाहीत अशी चर्चा व्यक्त केली जाते आहे.

पण या  चर्चेवर खडसेंनीच पांघरूण घातले  आहेत.  माझा पाय  बरा नाही म्हणून मी गेलो नाही असं त्यांनी सांगितलं आहे. ' कार्यशाळेला न जाण्याचं कुठलंही इतर   कारण नाही.  पण मला चालताना त्रास होतोय. गेले ४ ते ५ दिवस माझा पाय दु:खतोय' असं खडसे म्हणाले.

तसंच  खडसे प्रस्थापित आहेत, विस्थापित नाहीत  हे मुख्यमंत्र्यांचं विधान योग्यच नाही. मी इतर पक्षात गेलो नाही, जाणारही नाही असं स्पष्टीकरणही खडसेंनी दिलं आहे .

First Published: Dec 20, 2017 11:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading