मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मोठा अनर्थ टळला! एकनाथ खडसे बालंबाल बचावले, धावत्या वाहनाचं फुटलं टायर

मोठा अनर्थ टळला! एकनाथ खडसे बालंबाल बचावले, धावत्या वाहनाचं फुटलं टायर

 वाहनचालकानं प्रसंगावधान राखून वाहनावर नियंत्रण मिळवलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

वाहनचालकानं प्रसंगावधान राखून वाहनावर नियंत्रण मिळवलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

वाहनचालकानं प्रसंगावधान राखून वाहनावर नियंत्रण मिळवलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

जळगाव, 1 नोव्हेंबर: भाजपला रामराम ठोकून नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे  (Eknath Khadse) हे रविवारी थोडक्यात बचावले. खडसे यांच्या धावत्या वाहनाचं (Car Accident) टायर फुटलं. वाहनचालकानं प्रसंगावधान राखून वाहनावर नियंत्रण मिळवलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. वाहनाचा अपघात होता होता वाचला आणि एकनाथ खडसे थोडक्यात बचावले.

धरणगाव-जळगाव (Jalgaon Highway) महामार्गावर हॉटेल अमोल समोर रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

हेही वाचा..भाषण करताना तोंडावरून खाली सरकला मास्क, राज्यमंत्र्यांनी पुण्यात भरला दंड

मिळालेली माहिती अशी की, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil deshmukh) यांच्या अमळनेर येथील कार्यक्रम आटोपून एकनाथ खडसे आपल्या वाहनाने जळगावकडे परत येत होते. धरणगाव- जळगाव महामार्गावर हॉटेल अमोल समोर त्यांचं वाहन येताच वाहनाचे टायर फुटलं. वाहन चालकानं प्रसंगावधान राखून क्षणात वाहनावर नियंत्रण मिळवलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना सायंकाळी साडे पाचच्या सुमारास घडली.

एकनाथ खडसे सुखरुप असून अपघातग्रस्त वाहन जागेवरच सोडून ते दुसर्‍या वाहनाने जळगावकडे रवाना झाले आहेत.

आपल्या आशीर्वादानं मी सुखरुप-एकनाथ खडसे

अमळनेरहून जळगावकडे येताना धरणगावजवळ माझ्या गाडीला किरकोळ उपघात झाला. गाडीचा वेग कमी होता. तसेच चालकांच्या प्रसंगावधानामुळे अपघात होता होता वाचला. आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने आम्ही सर्व सुखरुप आहोत. कोणालाही इजा झाली नाही, असा खुलासा एकनाथ खडसे यांनी केला आहे.

हेही वाचा..राज्यपाल नियुक्त 12 जागांच्या यादीत कुणाचा समावेश? अनिल देशमुख यांचं तिरकस उत्तर

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या निवासस्थानांचं उद्घाटन रविवारी दुपारी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, माजीमंत्री डॉ. सतीश पाटील, आमदार अनिल पाटील, चिमणराव पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार दिलीप वाघ उपस्थित होते.

First published:

Tags: Eknath khadse