मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'संजय राठोडांना मंत्रिपद नाथाभाऊंना मात्र...' खडसेंची खदखद पुन्हा समोर

'संजय राठोडांना मंत्रिपद नाथाभाऊंना मात्र...' खडसेंची खदखद पुन्हा समोर

39 दिवसांनंतर अखेर राज्याच्या मंत्रिमंडळाचा (Maharashtra Cabinet Expansion) विस्तार झाला आहे. संजय राठोड (Sanjay Rathod) यांना मंत्रिपद दिल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी टीका केली आहे.

    भुसावळ, 9 ऑगस्ट : 39 दिवसांनंतर अखेर राज्याच्या मंत्रिमंडळाचा (Maharashtra Cabinet Expansion) विस्तार झाला आहे. मंत्रिमंडळाच्या या विस्तारावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. 18 मंत्र्यांनी शपथ घेतली पण यात एकही महिलेचा समावेश नसल्याचं दु:ख असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिली आहे. तर संजय राठोड (Sanjay Rathod) आणि अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना मंत्रिपद मिळाल्यामुळेही विरोधकांनी टीका केली आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी संजय राठोड यांना महाविकासआघाडी सरकार असताना वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता, पण आता त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी यावरून सरकारवर टीका केली आहे. 'फक्त आरोपांवरून नाथाभाऊला सर्व मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता, मात्र ज्यांच्यावर फक्त आरोप नाही तर सर्व चित्र स्पष्ट असताना, पुरावे समोर असताना कारवाई न करता मंत्रिमंडळात सहभागी केले जाते,' अशी खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. भाजपच्या गटात गेल्यानंतर स्वच्छ होऊ पारदर्शी झाले, असं हे पारदर्शक सरकार अशा मंत्र्यांना घेऊन काम करणार आहे, अशी टीकाही खडसे यांनी केली. संजय राठोड यांना मंत्री करण्याच्या निर्णयावर विरोधकच नाही तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही टीका केली आहे. पुजा चव्हाण च्या मृत्युला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे, माझा न्याय देवतेवर विश्वास लडेंगे….जितेंगे, असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलं आहे. जळगावला दोन मंत्री दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारामध्ये गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील हे दोन कॅबिनेट मंत्री झाले आहेत, त्यामुळे आता डबल इंजिन झाले असून जिल्ह्यातील प्रलंबित कामं दुप्पट वेगाने होतील, अशी अपेक्षा एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. तसंच विकासकार्यात आपणही त्यांना सहकार्य करू, असं खडसेंनी सांगितलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: BJP, Eknath khadse, Shivsena

    पुढील बातम्या