खडसेंचं ठरलं? राष्ट्रवादी आणि सेनेच्या मोठ्या नेत्यांच्या भेटीला नागपुरात पोहोचले

काही दिवसांपूर्वीच आपल्याला वेगळा निर्णय घ्यावा लागेल असं सांगून एकनाथ खडसे यांनी आपली खदखद बोलून दाखवली होती.

  • Share this:

नागपूर, 17 डिसेंबर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अजूनही पक्षावर नाराज आहे. वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असे संकेत देणारे खडसे आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. त्यामुळे खडसे मोठा निर्णय घेण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

एकनाथ खडसे नागपूरमध्ये पोहोचले आहे. आज रात्री 9 वाजेच्या सुमारास ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. खडसे यांच्या भेटीमुळे राजकीत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांनी आपली खदखद बोलून दाखवली होती.

विधानसभा निवडणुकीत आधी तिकीट न दिल्यामुळे खडसे नाराज होते. त्यानंतर मुलगी रोहिणी खडसे यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. रोहिणी यांचा अवघ्या 3 हजार मतांनी पराभव झाला. त्यामुळे खडसे यांनी पक्षातील काही जणांनी यासाठी कामं केलं असा गंभीर आरोप केला होता. याबद्दल तसे पुरावे त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिले होते. तसंच त्यांनी नावं जाहीर करण्यासाठी परवानगीही मागितली होती. परंतु, पाटील यांनी आश्वासन देऊन त्यांची मनधरणी केली होती.

उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट

एकनाथ खडसे यांनी याआधीही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. दिल्लीत खडसे यांनी शरद पवारांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. यावेळी पवारांनी मुलीच्या पराभवाबद्दल माहिती जाणून घेतली होती. त्यानंतर विधिमंडळात जाऊन खडसे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.

'...तर मला वेगळा विचार करावा लागेल'

दरम्यान, "मी पक्ष काही सोडणार नाही. गेली 40 वर्ष या पक्षाला दिली त्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेणार नाही. मला निर्णय प्रक्रियेत काढून टाकण्यात आलं. मला कोअर ग्रुपमधून काढून टाकलं, कोणत्याही कार्यक्रमाला बोलावलं जात नाही. असं जर वारंवार करत असाल तर मी काही देव नाही. मीही शेवटी माणूस आहे. माझ्यावर असाच अत्याचार होत राहिला तर मला वेगळा विचार करावा लागेल", असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळे एकनाथ खडसे काय निर्णय घेतात हे पाहण्याचं ठरणार आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 17, 2019 08:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading