...तेव्हा भाजप-सेना युती कुणी तोडली? एकनाथ खडसेंनी केला मोठा खुलासा

...तेव्हा भाजप-सेना युती कुणी तोडली? एकनाथ खडसेंनी केला मोठा खुलासा

एकनाथ खडसे यांनी आज दुपारी मुक्ताईनगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन भाजप पक्ष सोडत असल्याची अखेर घोषणा केली.

  • Share this:

मुक्ताईनगर, 21 ऑक्टोबर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. पक्ष सोडत असताना एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसंच, भाजप-शिवसेनेची युती तोडण्याचा निर्णय आपण घेतला नसल्याचेही सांगितले.

एकनाथ खडसे यांनी आज दुपारी मुक्ताईनगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन भाजप पक्ष सोडत असल्याची अखेर घोषणा केली. यावेळी पत्रकारांनी शिवसेना आणि भाजप युती तोडण्याचा निर्णय कुणाचा होता असा सवाल विचारला असता खडसेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.

'त्यावेळी भाजप शिवसेना युती तोडण्याचा निर्णय हा माझ्या एकट्याचा नव्हता. हा सामूहिक निर्णय होता. मी पक्षाच्या सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांनी मिळून युती तोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी मी विरोधी पक्षनेता होतो म्हणून मला घोषणा करावी लागली', असं खडसे यांनी स्पष्ट केले.

खंडाळ्याजवऴ बस उलटून भीषण अपघात, 2 जणांचा मृत्यू 17 जखमी

'भारतीय जनता पक्षाचे 40 वर्षांपासून काम पाहत आलो. जेव्हा भाजप खेड्यापाड्यात पोहोचली नव्हती. तेव्हापासून गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यासह अनेक नेत्यांसोबत काम करत आलो. आतापर्यंत पक्षात काम करत असताना मला अनेक पदं मिळाली हे मी नाकारत नाही.' असं खडसे यांनी सांगितले.

मी आजपर्यंत राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यावर व्यक्तीगत टीका केली नाही. विरोधीपक्ष नेता असल्यामुळे सरकारवर टीका केली होती, असंही खडसे म्हणाले.

'देवेंद्र फडणवीसांमुळे पक्ष सोडतोय'

भाजप पक्ष सोडण्याचे एकमेव कारण म्हणजे, देवेंद्र फडणवीस हेच आहे. त्यांच्यामुळे आपण पक्ष सोडत आहोत. ते जेव्हा मुख्यमंत्री होते. तेव्हा माझ्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंजली दमानिया यांनी माझ्यावर खोटे आरोप केले होते. त्यांनी सांताक्रुझ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रात्रभर गोंधळ घातला होता. पोलीस सुद्धा गुन्हा दाखल करण्यासाठी तयार नव्हते. त्यावेळी स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना फोन करून  गुन्हा दाखल करण्यास सांगितले होते, असा गौप्यस्फोट खडसेंनी केला.

खडसेंचा निर्णय त्यांच्यासाठीच दुर्दैवी, आता दिल्या घरी सुखी राहा- रावसाहेब दानवे

'खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर मी फडणवीस यांच्याशी बोललो तेव्हा, नाईलाजाने तक्रार दाखल करावी लागली, असं उत्तर फडणवीस यांनी दिले. ते तपास करून तक्रार दाखल करा, असं सांगू शकत होते. पण, अत्यंत खालच्या स्ताराचे राजकारण करण्यात आले, अशी टीकाही खडसेंनी केली.

Published by: sachin Salve
First published: October 21, 2020, 3:11 PM IST
Tags:

ताज्या बातम्या