Home /News /maharashtra /

BREAKING : 'कुणी किती भूखंड खाल्ले हे आता दाखवून देईन' एकनाथ खडसेंनी केला गजर; वाचा 13 ठळक मुद्दे

BREAKING : 'कुणी किती भूखंड खाल्ले हे आता दाखवून देईन' एकनाथ खडसेंनी केला गजर; वाचा 13 ठळक मुद्दे

40 वर्षं भाजपची सेवा करून मला काय मिळालं? असा सवाल करत एकनाथ खडसे यांनी NCP मध्ये प्रवेश करतेवेळीच भाजपविरोधात तोफ डागली. पक्षश्रेष्ठींनीच मला राष्ट्रवादीत द्यायचा सल्ला दिल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

  मुंबई, 23 ऑक्टोबर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत अखेर उत्तर महाराष्ट्राचे मोठे नेते एकनाथ खडसे यांनी NCP मध्ये प्रवेश केला. गेली काही वर्षं खडसे यांची भाजपमधली नाराजी लपून राहिलेली नव्हती. विधानसभा निवडणुकांनंतर तर त्यांनी उघड भूमिका घ्यायला सुरुवात केली होती. अखेर अनेक दिवसांच्या चर्चेनंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुलगी रोहिणी खडसे यांच्यासह प्रवेश केला. प्रवेश करतेवेळी त्यांनी आणखी काही मोठे गौप्यस्फोट केले आहेत. वाचा नाथाभाऊंच्या भाषणातले 8 मोठे मुद्दे :
   1. मी पाठीत खंजीर कधी खुपसला नाही.
   2. गोड बोलून धोका देणं मला जमत नाही.
   3. महिलेला समोर ठेऊन कधी राजकारण केलं नाही.
   4. भाजपमध्ये माझ्यावर अन्याय झाला.
   5. 40 वर्षे सेवा करुन मला काय मिळालं?
   6. माझ्या आरोपांवर भाजपनं अजूनही उत्तर दिलं नाही.
   7. मला चार वर्षं घरी बसवलं.
   8. दिल्लीतल्या ज्येष्ठांनीच मला राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला दिला.
   9. पक्षश्रेष्ठींनी भाजपमध्ये मला भवितव्य नसल्याचं सांगितलं.
   10. शरद पवारांचं मार्गदर्शन लाभणे हे भाग्याचं.
   11. नाथाभाऊंची ताकद आता मी जळगावमध्ये दाखवेन.
   12. तुम्ही ईडी मागे लावली तर मी सीडी लावेन
   13. कुणी किती भूखंड खाल्ले हे आता दाखवून देईन
  गेले अनेक दिवस चर्चेत असलेले एकनाथ खडसे यांनी मुलगी रोहिणी यांच्यासह अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 40 वर्षं भारतीय जनता पक्षाबरोबर असलेले खडसे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. जयंत पाटील यांनी खडसे यांचं स्वागत केलं.  पण खडसे यांना लगेच कुठलंही मंत्रिपद मिळण्याची शक्यता नाही, अशी चर्चा आहे. खडसे यांनीही आपल्या भाषणात माझी कुठलीही अपेक्षा नसल्याचं जाहीर केलं. तुम्ही भाजपविरोधात बंड पुकारलंत तर तुमच्या मागे ED ची वगैरे कारवाई लावतील, असं पाटील म्हणाले होते. पण त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी भाजपला आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता टोला हाणला. "कार्यकर्त्यांची इच्छा होती. म्हणून मी राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे. भाजपमध्ये अनेक लोक कंटाळले आहेत. पण ते बोलू शकत नाहीत", असंही खडसे म्हणाले. "एकनाथ खडसे यांच्याशी कुठल्याही पदाची चर्चा झालेली नाही. त्यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता पक्षप्रवेश केला आहे," असं प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनीही या वेळी भाषण करताना सांगितलं.
  Published by:अरुंधती रानडे जोशी
  First published:

  Tags: BJP, Eknath khadse, NCP

  पुढील बातम्या