एकनाथ खडसे इज बॅक, भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे केली मोठी मागणी

एकनाथ खडसे इज बॅक, भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे केली मोठी मागणी

एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्या राजकीय पुनर्वसनाची इच्छा बोलून दाखवली आहे.

  • Share this:

जळगाव, 03 मे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा प्रश्नावरून राजकारण चांगलेच तापले होते. परंतु, अखेर विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आता यात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी उडी घेतली असून पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली आहे.

'मला महाराष्ट्राच्या राजकारणात रस आहे. त्यामुळे मला विधानपरिषदेवर संधी द्यावी', अशी मागणी आपण पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. एकनाथ खडसे आज दुपारी जळगावात आले होते. त्यावेळी आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा - शरद पवारांनी PM मोदींना पत्र लिहिल्यानंतर भाजप नेत्याने दिलं उत्तर

'मागील राज्यसभा निवडणुकीत माझ्या नावाची शिफारस करण्यात आली होती. पण, मी त्या निवडणुकीसाठी इच्छुक नव्हतो. परंतु, महाराष्ट्राच्या राजकारणात मी इच्छुक आहे. या विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी मी इच्छुक आहे. त्याबद्दल पक्ष योग्य निर्णय घेईल', अशी अपेक्षाही खडसेंनी बोलून दाखवली.

'राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यामुळे त्यांना राज्यपाल सदस्य म्हणून कुणाची नेमणूक करायची याचा निर्णय घेण्याचा किंवा नकारण्याचा अधिकार आहे. त्यामुळे तो निर्णय मान्य करावा लागेल', असंही खडसे म्हणाले.

हेही वाचा - कोरोना: डॉक्टरांनी सोडली जगण्याची आशा, 81 वर्षांच्या वडिलांना मुलाने वाचवलं

विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापत असल्याचे पाहायला मिळत आहे. एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्या राजकीय पुनर्वसनाची इच्छा बोलून दाखवली आहे.

विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याचं अवघड?

दरम्यान, मे महिन्यात विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाले आहे. पण आता नऊ जागांसाठी महाविकास आघाडी 6 उमेदवार देणार, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. तर दुसरीकडे 4 जागा भाजप आमदारांच्या संख्याबळावर जिंकेल, असा दावा भाजपचा आहे.त्यामुळे महाविकास आघाडीचे सहा आणि भाजप आणि चार उमेदवार उभे केले तर नऊ जागांसाठी दहा उमेदवार असतील. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याचं अवघड आहे.

वास्तविक महाविकास आघाडी संख्याबळानुसार पाच जागा सहज जिंकतात. फक्त एका जागेसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे त्या तुलनेनं भाजपच्या जवळ असलेल्या संख्याबळानुसार, भाजपाचे अपक्षांचा पाठिंबा लक्षात घेत चौथा उमेदवार यासाठी अवघ्या चार ते पाच मतांची अधिक गरज लागत आहे.

हेही वाचा - मद्यपींना खूशखबर! मुंबई-पुण्यासारख्या रेड झोनमध्ये सुरु होतील वाईन शॉप

त्यामुळे भाजप कोणत्याही परिस्थितीत 14 उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचे समजत आहे. जर तसं झालं तर मात्र, नऊ जागांच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत दहा उमेदवार असं चित्र निर्माण होईल आणि त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणे कठीण आहे.

परंतु, जर महाविकास आघाडीमधील काही नेते तसंच भाजपतील काही नेते एकमेकांशी संपर्क करून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नदेखील करतील. असं जर झालं तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होईल. पण तुर्तास तरी महाविकास आघाडी आणि भाजप दोन्ही एकमेकांवर दबावतंत्राचा वापर करत आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: May 3, 2020, 5:08 PM IST

ताज्या बातम्या