मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

एकनाथ खडसेंची 'फडणवीस स्टाईल'!, विधानपरिषदेत टाकला पेन ड्राईव्ह बॉम्ब

एकनाथ खडसेंची 'फडणवीस स्टाईल'!, विधानपरिषदेत टाकला पेन ड्राईव्ह बॉम्ब

विधिमंडळाच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह (Pen Drive) बॉम्ब टाकला. फडणवीस यांच्यानंतर आता एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनीही विधिमंडळात असाच पेन ड्राईव्ह डेटा जमा केला आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

मुंबई, 23 ऑगस्ट : विधिमंडळाच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह (Pen Drive) बॉम्ब टाकला. महाविकासआघाडी सरकारच्या काळातील विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांचं स्टिंग ऑपरेशन या पेन ड्राईव्हमध्ये होतं. फडणवीस यांच्या पेन ड्राईव्ह बॉम्बमुळे चांगलीच खळबळ उडाली होती. फडणवीस यांच्यानंतर आता एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनीही विधिमंडळात असाच पेन ड्राईव्ह डेटा जमा केला आहे. रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणातला डेटा या पेन ड्राईव्हमध्ये असल्याचं खडसे म्हणाले आहेत.

'रोहिणी खडसे यांच्यावर हल्ला झाला त्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला, पण आतापर्यंत या प्रकरणाची चौकशी झालेली नाही. तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी ही चौकशी आयपीएस अधिकाऱ्याकडे दिली होती, पण पोलिसांनी आरोपींना सहकार्य केलं,' असं खडसे विधान परिषदेमध्ये म्हणाले.

'आरोपींना तडिपारीच्या नोटीस दिल्या होत्या त्या रद्द करण्यात आल्या. मुख्यमंत्री गुंडांना संरक्षण देत असतील तर पोलीस तपास कसा करणार? महिलेवर हल्ला होतो आणि त्याच आरोपींना संरक्षण दिले जाते, यापेक्षा दुर्दैवं कोणतं? महिलांविषयी वाईट बोलत आहेत हे गुंड, केलेली तक्रार दबाव आणून परत घ्यायला लावली,' असं म्हणत खडसे यांनी या विषयाची व्हिडिओ आणि ऑडियो क्लिपचा पेन ड्राईव्ह सभागृहात दिला.

एकनाथ खडसे यांनी हा पेन ड्राईव्ह दिल्यानंतर विरोधी पक्षाचे आमदार चांगलेच आक्रमक झाले. अशा गुंडांना मुख्यमंत्री संरक्षण देणार असतील, तर दाद कोणाकडे मागायची. 307 चा गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट आहेत. या आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे. आजच्या आज याविषयी कारवाई झाली पाहिजे, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास (Ambadas Danve) दानवे म्हणाले. दरम्यान उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी सरकारने याची गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले.

एकनाथ खडसे यांच्या या आरोपांनंतर सरकारकडून मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) उत्तर द्यायला उभे राहिले, पण शंभुराज देसाई आणि खडसे यांच्यात खडाजंगी झाली. संबंधित पेन ड्राईव्ह आणि क्लिप सभागृहामार्फत द्यावा, योग्य ती कारवाई केली जाईल, असं शंभुराज देसाई म्हणाले.

शंभुराज देसाई यांच्या या उत्तराने एकनाथ खडसे नाराज झाले. आवश्यकता असल्याच चौकशी करू? चौकशी करू असं बोलत नाहीयेत. हा सभागृहावर अन्याय आहे. आम्ही दिलेले पेन ड्राईव्ह खोटे होते, तर उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले एवढे पेन ड्राईव्हपण खोटे होते का? असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला. तसंच या प्रकरणी एसआयटी नेमण्याची मागणीही खडसे यांनी केली. यानंतर पेन ड्राईव्हमध्ये काय आहे त्याची तपासणी करून पुढील कारवाईचे आश्वासन देऊ, असं शंभुराज देसाई म्हणाले.

First published:

Tags: Devendra Fadnavis, Eknath khadse