मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'40 वर्ष मी चांगला होतो, मात्र राष्ट्रवादीत जाताच...'; एकनाथ खडसेंची भाजपवर सडकून टीका

'40 वर्ष मी चांगला होतो, मात्र राष्ट्रवादीत जाताच...'; एकनाथ खडसेंची भाजपवर सडकून टीका


'विकास कामात आपण कधीही खोडा घातलेला नाही, उलट खडसे यांनी तो घातला'

'विकास कामात आपण कधीही खोडा घातलेला नाही, उलट खडसे यांनी तो घातला'

भाजपवर टीका करत खडसे म्हणाले की सध्याचं राजकारण तुम्ही पाहात आहात. कोणाच्या मागे ईडीच्या चौकशा लावल्या जातात, हे स्पष्टपणे दिसतं.

जळगाव 10 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) मागील काही दिवसांपासून भाजपवर सडकून टीका करताना दिसत आहेत. खडसे (Eknath Khadse Criticizes BJP) यांनी नुकतंच जळगावातील रावेर येथे झालेल्या एका कार्यकर्ता मेळाव्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपवर नाव न घेता सडकून टीका केली आहे. चाळीस वर्ष जेव्हा मी तुमच्यासोबत होतो, तेव्हा चांगला होतो. मग आता राष्ट्रवादीत येताच माझ्या मागे ईडी (ED) का लावली गेली, असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला.

'हिंदूचं घर जळणार तेव्हा मुसलमानचं घर थोडी सुरक्षित राहणार'

राष्ट्रवादीत गेल्यापासून आपल्या मागे ईडीची चौकशी लावली जात असून तारीख पे तारीखचा खेळ सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं. भाजपवर टीका करत खडसे म्हणाले की सध्याचं राजकारण तुम्ही पाहात आहात. कोणाच्या मागे ईडीच्या चौकशा लावल्या जातात, हे स्पष्टपणे दिसतं.

आपण भाजप पक्षाच्या विस्तारासाठी गाव पातळीवर परिश्रम घेतले तसंच कष्ट केलं. मात्र, ज्या माणसाच्या बळावर तुम्ही इतके दिवस उभे राहीले, आता त्याचाच तुम्ही असा अपमान केला, असंही खडसे यावेळी बोलताना म्हणाले.

ठाणेकरांसाठी खूशखबर, यंदा 'पाणीबाणी' नाही!

भाजपवर जहरी टिका करताना खडसे पुढे म्हणाले, की तुम्ही जे करत आहात, त्याचं फळ तुम्हाला नक्कीच भोगावं लागेल, जनता तुम्हाला माफ करणार नाही. जळगावातील रावेर येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात एकनाथ खडसे बोलत होते.

First published:

Tags: BJP, Eknath khadse