Home /News /maharashtra /

INSIDE STORY : एकनाथ खडसे यांचा मुख्यमंत्र्यांना एक फोन आणि जळगावात भाजपला पडले भगदाड!

INSIDE STORY : एकनाथ खडसे यांचा मुख्यमंत्र्यांना एक फोन आणि जळगावात भाजपला पडले भगदाड!

जळगाव महापालिकेमध्ये (Jalgaon Municipal Corporation) सत्तांत्तराचा डाव हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav Thackery) आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या एका फोन कॉलमुळे घडून आला.

जळगाव, 18 मार्च : जळगाव महापालिकेमध्ये (Jalgaon Municipal Corporation Mayor Election) सांगली पॅटर्न राबवत अखेर शिवसेनेनं (Shivsena) भाजपला (BJP) सत्तेवरून खाली खेचत भगवा फडकावला आहे. शिवसेनेच्या महापौरपदाच्या (Mayor) आणि उपमहापौरपदाच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे. पण, शिवसेनेच्या या सर्जिकल स्ट्राईकमागे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची महत्त्वाची भूमिक आहे. जळगाव महापालिकेमध्ये सत्तांत्तराचा डाव हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) आणि एकनाथ खडसे (Eknath khadse) यांच्या एका फोन कॉलमुळे घडून आला.  एकनाथ खडसे यांनी 8 दिवसांपूर्वी जळगावमधील विकास कामाच्या निमित्तने उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. यावेळी विकास कामासाठी आपण लक्ष द्यावे अशी विनंती खडसे यांनी केली होती. या चर्चेच्या दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी जळगावमध्ये महापालिकाच्या निवडणुकीला किती अवधी आहे अशी विचारणा केली होती. यावर निवडणूक होण्यास अडीच वर्षांचा अवधी आहे, पण महापौरपदा निवडणूक 18 मार्चला आहे, आपल्या संपर्कात भाजपजे 22 नगरसेवक आहे, अशी माहिती खडसेंनी दिली. शाळेत डान्सबार, लॉज आणि मद्यविक्रीची परवानगी द्या'; मुख्यमंत्र्यांकडे अजब मागणी तसंच, खडसे यांनी शहराच्या विकासासाठी शिवसेनेचा महापौर असावा अशी इच्छाही बोलून दाखवली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांना एकनाथ खडसे यांच्याशी बोलून पुढील रणनीती ठरवण्याचे आदेश दिले.  दोन्ही नेत्यांमध्ये फोनवरच बोलणे झाले. त्यानंतर सेनेकडून एकनाथ शिंदे मदतीसाठी पुढे आले. एकनाथ खडसे यांनी जळगावात तातडीने सूत्र फिरवत भाजपमध्ये नाराज असलेल्या नगरसेवकांना आपल्या निवास्थानी बोलून घेतले. सुनिल खडके आणि त्यांच्या समर्थकांसह 10-12 नगरसेवक मुक्ताईनगरमध्ये खडसे यांच्या फार्म हाऊसवर पोहोचले. तिथे सविस्तर चर्चा करून महापालिका ताब्यात घेण्याची रणनीती आखण्यात आली. त्यानंतर नाराज नगरसेवकांनी सर्व बाबींचा विचार करून खडसेंना होकार दिला. सत्तांतर करण्यासाठी हालचालींना वेग आाला आणि 12 जणांची संख्या 22 जणांवर पोहोचली.  शिवसेनेचे नगरसेवक सुनिल महाजन सुद्धा खडसेंच्या भेटीला पोहोचले. यावेळी त्यांनी आपल्या पत्नी जयश्री महाजन यांना महापौरपदाची उमेदवारी द्यावी, यासाठी सेनेच्या 15 नगरसेवक आणि 3 एमआयएमच्या नगरसेवकांचा पाठिंबा आहे, असं सांगितलं. रियाचा चेहरा चित्रपटात झळकणार; 2 मिनिटांच्या ट्रेलरमध्ये मिळाली 2 सेकंदांची जागा त्यानंतर उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, विनायक राऊत या नेत्यांशी चर्चा झाली आणिमहापौर पदाकरता जयश्री सुनिल महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. नगरसेवक तर गळाला लागले त्यांची व्यवस्था कुठे करायची असा प्रश्न निर्माण झाला. गुलाबराव पाटील यांनी तातडीने सूत्र फिरवली आणि सर्व नगरसेवकांना एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात देण्याचे ठरले. तातडीने सर्व नगरसेवकांना मुंबईला रवाना करण्यात आले. ठाण्यात 16 तारखेला सर्व नगरसेवक पोहोचले. त्यानंतर आणखी काही भाजपचे नाराज नगरसेवकांनी सेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे शिवसेनेकडे नगरसेवकांची संख्या 45 वर पोहोचली. अखेर आज ठरल्याप्रमाणे सर्व नगरसेवकांनी शिवसेनेच्या बाजूने मतदान केले. एकाही नगरसेवकाचे मत इकडच्या तिकडे झाले नाही. भाजपच्या ताब्यात असलेली महापालिका अलगदपणे ताब्यात घेण्यात आली.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Eknath khadse, Uddhav Thackery, उद्धव ठाकरे

पुढील बातम्या