भाजपमधील हितचिंतकांना सोबत घेवून निर्णय घेणार, खडसेंचं मोठं विधान

भाजपमधील हितचिंतकांना सोबत घेवून निर्णय घेणार, खडसेंचं मोठं विधान

'भाजपातील आपल्या हितचिंतकाना घेऊन आपण योग्य तो निर्णय घेऊ,' असं सूचक वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं आहे.

  • Share this:

जळगाव, 10 मे : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची घोषणा केल्यानंतर पक्षातील ज्येष्ठांना डावलल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, 'कोरोनाच्या गंभीर संकटातून देश जात असतानाच कोणताही राजकीय विचार आज करणे योग्य होणार नाही. योग्य वेळी भाजपातील आपल्या हितचिंतकाना घेऊन आपण योग्य तो निर्णय घेऊ,' असं सूचक वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं आहे.

एकनाथ खडसे यांना भाजपने विधानपरिषद निवडणुकीतही डावलल्याने त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पक्षातील खडसे यांचे अनेक हितचिंतक त्यांना काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे, असं सांगत आहेत. आपल्या हितचिंतकांचा विचार करता खडसे यांनी उत्तर देताना म्हटलं आहे की, 'आपल्याला विधान परिषदेचे तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती, आपल्यासारखे अनेक नेते पक्षाशी अनेक वर्षांच्या पासून एकनिष्ठ राहून काम करीत आहेत. आपल्याला तिकीट मिळाले नसले तरी पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या अन्य सदस्याला ते मिळायला पाहिजे होते. मात्र तसं न होता पक्ष विरोधी काम करणाऱ्या आणि बाहेरून पक्षात आयत्या वेळी आलेल्या लोकांना हे तिकीट मिळाल्याने कार्यकर्ते नाराज आहे,' असं खडसे यांनी म्हटलं आहे.

'नाराजीतून अनेक कार्यकर्ते अन्याय होत असल्याच्या भावनेतून आपण काही तरी निर्णय घ्यावा, असा आग्रह आहेत. तर काही पक्षही त्यांच्याकडे येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र सध्या कोरोनाच्या गंभीर संकटातून जात असताना कोणताही राजकीय विचार करणे आज योग्य होणार नाही,योग्यवेळी भाजपातील आपल्या हित चिंतकाना सोबत घेऊन त्यांच्याशी विचार विनिमय करून योग्य तो निर्णय आपण घेऊ,' असा गौप्यस्फोटही एकनाथ खडसे यांनी केला आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 10, 2020, 4:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading