Home /News /maharashtra /

चौकशीला हजर व्हा, खडसेंना 'या' तारखेला ईडीने बोलावले!

चौकशीला हजर व्हा, खडसेंना 'या' तारखेला ईडीने बोलावले!

भोसरी इथं भूखंड खरेदी प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांना महसूल मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते.

    मुंबई, 27 डिसेंबर : भाजपला धक्का देत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पण त्याच्यामागे चौकशीचा ससेमिरा कायम आहे. एकनाथ खडसे यांना (सक्तवसुली संचालनालय) ईडीने नोटीस बजावली आहे. भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली असून 30 डिसेंबर रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. भोसरी इथं भूखंड खरेदी प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांना महसूल मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर चार वर्ष खडसे यांना मंत्रिपदापासून दूर राहावे लागले. याच प्रकरणी आता खडसे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुणे आणि नाशिक येथील अॅन्टिकप्शन ब्युरोकडून पाच वर्षांत चौकशी करण्यात आली होती. तसंच झोटिंग समिती आणि आयकर विभागाने देखील चौकशी केली होती.  आता या प्रकरणाची ईडी चौकशी करणार आहे. दरम्यान, भोसरी भूखंड प्रकरणी याआधीही चार वेळा आपली चौकशी झाली आहे. आता ED पाचव्यांदा चौकशी करणार आहे. ED ला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचं खडसेंनी सांगितलं. याआधीही आपण सर्व तपास यंत्रणांना आणि चौकशी आयोगांना वेळोवेळी सहकार्य केल्याचं ते म्हणाले. भाजपातून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले एकनाथ खडसे यांच्यामागेही आता EDच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. ED च्या नोटिशीनंतर एकनाथ खडसेंची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. ईडीची चौकशी लावली तर मी सीडी लावेन... एकनाथ खडसे भाजपमध्ये नाराज होते. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आपली ED कडून चौकशी केली जाऊ शकते, असा अंदाज देखील खडसेंनी होता. 'त्यांनी ईडीची चौकशी लावली तर मी सीडी लावेन, असा इशारा देखील एकनाथ खडसे यांनी भाजपला उद्देशून दिला होता. त्यामुळे आता खरंच एकनाथ खडसे सीडी लावतात का? आणि या सीडीतून कोणाचा भांडाफोड करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या