जळगाव, 13 जून: राज्यात कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यामुळे सर्वत्र निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे वारकऱ्यांना पंढरपूरच्या वारीचे (Pandharpur wari 2021) वेध लागले आहे. मात्र, ठाकरे सरकारने (MVA Government) अटी शर्थींसह परवानगी दिली आहे. परंतु, मुक्ताबाई पालखी (muktabai palkhi) सोहळ्यावरून राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी खंत व्यक्त केली आहे.
मुक्ताईनगर येथील मुक्ताबाईची पालखी गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूरला जात असते. हा पायी यात्रा सोहळा गेल्या अनेक वर्षांपासून साजरा होत आहे. या पायी वारीमध्ये हजारो लोक सामील होत असतात. या पायी यात्रेमध्ये प्रत्येक गावांमध्ये मुक्काम असतो मुक्कामाच्या दरम्यान गावातील लोक मुक्ताबाईच्या पादुकांची पूजा करतात आणि पालखी सोहळा पुढे जात असतो ही परंपरा राहिली आहे.
बिलासाठी 18तास ताटकळत ठेवला मृतदेह;अजितदादांच्या एका फोननं गरीब कुटुंबाला दिलासा
परंतु, आता कोरोना महामारीमुळे मागच्या वर्षी आणि यावर्षी या परंपरेला छेद दिला गेला आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने या पालखी सोहळ्यासाठी शंभर जणांना एसटीमधून जाण्यासाठी परवानगी दिली आहे.
या मराठी माणसामुळे मिळते रविवारची सुट्टी, 6 वर्षाच्या संघर्षानंतर मिळालं होतं यश
पांडुरंगाच्या दर्शनासाठी जगभरातला वारकरी आसुसलेला असतो, आषाढी एकादशीला पांडुरंगाचे दर्शन व्हावं ही वारकऱ्यांची इच्छा असते. परंतु, वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून राज्य सरकारला प्रस्ताव अनेक पाठवलेले आहेत. या प्रस्तावाचा विचार झाला असता तर अनेक वारकऱ्यांना पांडुरंगाचे दर्शन घेता आले असते, अशी खंत एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.