Home /News /maharashtra /

जळगावच्या राजकारणातील मोठी बातमी, एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन आमनेसामने

जळगावच्या राजकारणातील मोठी बातमी, एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन आमनेसामने

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन आज जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले आहे.

    जळगाव, 02 जानेवारी : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे नाराज असल्याचं उघड झालं आहे. एकनाथ खडसे यांनी दोनच दिवसांपूर्वी गौप्यस्फोट करून पक्षाला घरचा अहेर दिला होता. परंतु, आज जळगावमधील भाजपच्या कार्यालयामध्ये भाजपचे नेते गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे आमनेसामने आले आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्यानंतर काही तास उलटत नाही. तेच  एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन हे आता एकाच मंचावर आले आहेत. जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जळगाव जिल्हा भाजपच्या कोअर कमिटीची बैठक वसंतस्मृती कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी दोन्ही नेते उपस्थित आहेत. जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी होणार आहे. या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला एकनाथ खडसे, गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, संघटनमंत्री किशोर काळकर, जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, सुरेश भोळे आदी उपस्थित आहेत.   जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पदाधिकारी आणि सदस्यांची ही बैठक बोलावण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच खडसे हे भाजपच्या बैठकीला दिसून आले आहे. विशेष म्हणजे, गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात वाद सर्वश्रुत आहे. दोन्ही नेत्यांच्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट दरम्यान,  मुलीच्या पराभवास आणि आपले तिकीट कापण्यात पक्षातील काही लोकांचा हात असल्याचा आरोप करणारे एकनाथ खडसे यांनी आता थेट संबंधित नेत्यांची नावंच जाहीर केली आहे. 'मला तिकीट मिळू नये म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी कोअर कमिटीच्या बैठकीत नकारात्मक अहवाल दिला होता. या कमिटीतील माझ्या जवळच्या मित्रांनीच मला ही माहिती दिली,' असा खळबळजनक गौप्यस्फोट खडसे यांनी केला आहे. 'जे. पी. नड्डा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मी त्यांना ही सर्व माहिती दिली आहे. त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले तरी माझे समाधान झालेले नाही. मात्र मी भाजप सोडणार नाही, असेही खडसे यांनी स्पष्ट केले आहे. नाथाभाऊ शिवसेनेच्या संपर्कात जळगाव जिल्हा परिषदेवर एकनाथ खडसे यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे ही जिल्हा परिषद भाजपच्या हातातून हिसकावून घेण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. भाजपमध्ये नाराज असलेल्या एकनाथ खडसेंची शिवसेनेला साथ मिळण्याची शक्यता असून शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी तसे संकेत दिले आहेत. एवढंच नाही तर त्यांनी एक मोठा गौप्यस्फोटही केला. नाथाभाऊ हे आपल्या संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे पुढच्या काही काळात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुलाबराव पाटील म्हणाले, जिल्हा परिषद ही शिवसेनेच्या ताब्यात येणार आहे. अनेक लोक आमच्या संपर्कात असून त्याबाबात जास्त काही आताच सांगणार नाही. आतापर्यंत खडसे हे राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे बोलले जात होत. खडसे यांनी याआधी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चाही केली होती. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. एकनाथ खडसे यांनी पक्षातील आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: BJP, Chandrakant patil, Devendra Fadanvis, Eknath khadse, Girish mhajan, Jalgaon

    पुढील बातम्या