एकनाथ खडसेंना भाजपनं पुन्हा डावललं; आता वेट करणार की वेगळी वाट निवडणार?

एकनाथ खडसेंना भाजपनं पुन्हा डावललं; आता वेट करणार की वेगळी वाट निवडणार?

यावेळी तरी एकनाथ खडसे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळेल, अशी अपेक्षा त्यांना होती.

  • Share this:

मुंबई, 26 सप्टेंबर: भारतीय जनता पक्षाचे (BJP)राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J P Nadda) यांनी नव्या टीमची घोषणा केली आहे. अर्थात नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. महाराष्ट्राती नाराज नेत्या पंकजा मुंडे व विनोद तावडे यांची राष्ट्रीय सचिवपदी वर्णी लागली आहे. मात्र, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मात्र पुन्हा एकदा डावलण्यात आलं आहे. त्यामुळे आता एकनाथ खडसे आणखी वेट करणार की वेगळी वाट निवडणार? या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.

हेही वाचा...भाजप अध्यक्षांनी जाहीर केली टीम; विनोद तावडेंबरोबर पंकजा मुंडेंकडे मोठी जबाबदारी

भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर 8 महिन्यांनंतर जेपी नड्डा यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. नव्या कार्यकारिणीमध्ये महिला आणि तरुणांना मोठी संधी देण्यात आली आहे. अर्थातच महाराष्ट्रातले चार तरुण चेहरे यामध्ये आहेत. यावेळी तरी एकनाथ खडसे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळेल, अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र, तसं झालेलं नाही. हाराष्ट्रातून पंकजा मुंडे व तावडे यांना नवी जबाबदारी देण्यात आली आहे.

एकनाथ खडसे यांच्या तोंडाला पक्षाने पुन्हा एकदा पानं पुसली आहेत. खडसे गेले काही महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जाहीरपणे बोलत आहेत. आपल्याला मुद्दाम डावलल्याची खंत देखील एकनाथ खडसे यांनी यापूर्वी अनेकदा बोलून दाखवली आहे.  धक्कादायक म्हणजे  पंकजा मुंडे व  विनोद  तावडे यांचा समावेश करून पक्षानं खडसेंना स्पष्ट संदेशच दिल्याची चर्चा आहे. आता मात्र, एकनाथ खडसे काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा...दोन्ही गाद्या एकत्र, उगाच भांडणं लावणाऱ्यांना ठोका; संभाजीराजे छत्रपतींचा आदेश

राष्ट्रवादीच्या वाटेवर...?

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात काही दिवसांपूर्वी रंगली होती.  पण ही फक्त चर्चाच असल्याचं सांगून एकनाथ खडसे यांनी या मुद्याला पूर्णविराम दिला होता.

राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याशी आपली कसलीही चर्चा झालेली नाही. तसेच माझा पण आता तरी पक्षांतराचा विचार नाही. मात्र, मी राष्ट्रवादीच्या वाटेवर आहे, या विषयाची मला स्वतः माहिती नाही. ज्या कोणी हा विषय काढला असेल त्याच्याकडे याची माहिती असेल, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी दिली होती. त्यामुळेही खडसेंना पक्षानं डावललं असावं, अशी चर्चा जोर धरताना दिसत आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: September 26, 2020, 7:03 PM IST

ताज्या बातम्या