मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

LIVE : 'त्यांनी ED लावली तर मी CD लावेन' एकनाथ खडसेंचा गजर; पण मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी

LIVE : 'त्यांनी ED लावली तर मी CD लावेन' एकनाथ खडसेंचा गजर; पण मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी

भाजप सोडल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादीची वाट धरली आहे. पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात त्यांनी BJP वर मोठे आरोप केले.

मुंबई, 23 ऑक्टोबर : गेले अनेक दिवस चर्चेत असलेले एकनाथ खडसे (Eknath Khadse news) यांनी मुलगी रोहिणी (Rohini Khadse) यांच्यासह अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. 40 वर्षं भारतीय जनता पक्षाबरोबर असलेले खडसे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. जयंत पाटील यांनी खडसे यांचं स्वागत केलं.  पण खडसे यांना लगेच कुठलंही मंत्रिपद मिळण्याची शक्यता नाही, अशी चर्चा आहे. खडसे यांनीही आपल्या भाषणात माझी कुठलीही अपेक्षा नसल्याचं जाहीर केलं. तुम्ही भाजपविरोधात बंड पुकारलंत तर तुमच्या मागे ED ची वगैरे कारवाई लावतील, असं पाटील म्हणाले होते. पण त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी भाजपला आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता टोला हाणला. "कार्यकर्त्यांची इच्छा होती. म्हणून मी राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे. भाजपमध्ये अनेक लोक कंटाळले आहेत. पण ते बोलू शकत नाहीत", असंही खडसे म्हणाले. "एकनाथ खडसे यांच्याशी कुठल्याही पदाची चर्चा झालेली नाही. त्यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता पक्षप्रवेश केला आहे," असं प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनीही या वेळी भाषण करताना सांगितलं. एकनाथ खडसे यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची तुफान गर्दी झाली आहे. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशामुळे भाजपला लवकरच मोठा धक्का बसणार असल्याचा इशारा अनिल भाईदास पाटील यांनी गिरीश महाजन आणि भाजपला दिला आहे.
First published:

Tags: Eknath khadse

पुढील बातम्या