BREAKING : खडसेंच्या भूमिकेमुळे भाजपच्या गोटात खळबळ, गिरीश महाजनांच्या घरी गुप्त बैठक

BREAKING : खडसेंच्या भूमिकेमुळे भाजपच्या गोटात खळबळ, गिरीश महाजनांच्या घरी गुप्त बैठक

तर दुसरीकडे जामनेरमध्ये देवेंद्र फडणवीस दाखल झाल्यानंतर खडसे समर्थक आक्रमक झाले आहे.

  • Share this:

इम्तियाज अली, प्रतिनिधी

जळगाव, 13 ऑक्टोबर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणारा हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील भाजपमध्ये खळबळ उडाली. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जळगावाच्या दौऱ्यावर आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या घरी गुप्त बैठक सुरू आहे.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या निवासस्थानावर विरोधी पक्ष नेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झाले आहे. गिरीश महाजन यांच्या निवासस्थानावर काही निवडक आमदारांसोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक सुरू आहे.

शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री लिलावतीमध्ये दाखल, उद्धव ठाकरेंनी बैठक केली रद्द

देवेंद्र फडणवीस जामनेर येथील ग्लोबल महाराष्ट्र रुग्णालयाचे उद्घाटनासाठी आज जामनेर येथे आले आहे. या कार्यक्रमापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांच्या निवासस्थानावर निवडक आमदारांची बैठक घेतली आहे.

तर दुसरीकडे जामनेरमध्ये देवेंद्र फडणवीस दाखल झाल्यानंतर खडसे समर्थक आक्रमक झाले आहे. खडसे समर्थकांनी सोशल मीडियावर एकनाथ खडसे यांचा फोटो व्हायरल करत 'आमचा नेता आमचा अभिमान' अशाप्रकारे एकनाथ खडसे यांना समर्थन दर्शवले आहे. त्यामुळे जळगावात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, उद्धव ठाकरेंचे राज्यपालांना खरमरीत पत्र

विशेष म्हणजे, एकनाथ खडसे हे गेल्या अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज होते. अलीकडे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये निवड न झाल्यामुळे खडसे कमालीचे दुखावले गेले होते. त्यामुळे एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती.  परंतु, एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेशाबद्दल वृत फेटाळले होते.  मात्र, आता  एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित मानला जात आहे. लवकरच खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून याबद्दल अधिकृत घोषणा केली जाणार  आहे.

राष्ट्रवादीत प्रवेशानंतर एकनाथ खडसे यांच्यावर पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची माहिती आहे.  एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत कोण-कोण राष्ट्रवादीमध्ये येणार याची उत्सुकता लागली आहे.  खडसे यांच्या प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्र मधील अनेक नेते राष्ट्रवादीमध्ये दाखल होण्याचे संकेत मिळत आहे.

Published by: sachin Salve
First published: October 13, 2020, 3:31 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading