यवतमाळ,20 मार्च: राज्यात सर्वत्र कोरोना व्हायरसची भीती पसरली असताना उमरखेड तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उमरखेड तालुक्यातील हातनी येथील 8 वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह सापडला आहे. ही चिमुकली गेल्या 12 मार्चपासून बेपत्ता होती. तिला शोधण्यासाठी पोलिसांची पथक रवाना करण्यात आली आहे. आज शुक्रवारी चिमुकलीचा मृतदेह सापडला. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
चिमुरडीच्या अपहरणानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिची निर्घृन हत्या करण्यात आली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी गजानन भुरके याला ताब्यात घेतलं आहे.
हेही वाचा...हे फक्त पुण्यातच घडू शकतं! आठवलेंच्या Corona Go नंतर पुण्याचा हा VIDEO व्हायरल!
याबाबत मिळालेली माहिती अशी की, हातनी येथील 8 वर्षाची चिमुकली मुळावा येथील प्राथमिक शाळेत दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत होती 12 मार्चला ती शाळेत जाण्यास निघाली होती. मात्र, शाळा सुटल्यानंतर घरी परातलीच नाही. नंतर नातेवाईकांनी तिचा शोध सगळीकडे घेतला. मात्र, ती कुठेही आढळून आली नाही. अखेर तिच्या वडिलांनी पोफळी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्या नंतर पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. मात्र, चिमुरडीचा थांगपत्ता लागला नाही. अखेर स्थानिक गुन्हे शाखेचे तीन पथक तयार करण्यात आले होते. मुळावा येथील बस स्थानक समोरील एका दुकानाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात एक युवक चिमुरडीला गाडीवर बसवून घेऊन जाताना दिसला. त्या नंतर आरोपीचा शोध सुरू केला. या प्रकरणातील संशयित आरोपी गजानन भुरके याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा..'छत्रपती घराण्याची बदनामी करणाऱ्याला चोप दिला, माझ्या मनातली इच्छा पूर्ण'
भयानक सत्य आलं समोर...
आरोपीची पोलिसांनी कसून चौकशी केली असता भयानक सत्य समोर आलं आहे. 12 मार्चलाच आरोपीनं पुसद मार्गावरील घाटात चिमुरडीला ठार मारलं. पोलिसांनी शुक्रवारी तिचा मृतदेह पोलिसांनी घटनास्थळवरून ताब्यात घेतला. चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिला ठार मारण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा पोलिस अधीक्षक एम राजकुमार यांनी व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Murder case