आठवीतील विद्यार्थिनी एक दिवसासाठी बनली बुलडाण्याची 'कलेक्टर'

आठवीतील विद्यार्थिनी एक दिवसासाठी बनली बुलडाण्याची 'कलेक्टर'

पाडळी येथे सरकारी शाळांमध्ये सातवीत 98 गुण मिळवणाऱ्या पूनम देशमूखला एक दिवस जिल्हाधिकारी होण्याचा मान मिळाला आहे.

  • Share this:

बुलडाणा,2 मार्च: जागतिक महिला दिन सप्ताहाला सुरुवात झाली आहे. बुलडाण्याचे विद्यमान जिल्हाधिकाऱ्यांनी पुनम देशमुख या विद्यार्थिनीकडे एक दिवसाचा सांकेतिक पदभार सोपवला आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बुलडाणा जिल्ह्यात महिला सशक्तीकरण्याच्या उद्देशाने महिला सप्ताहाला आजपासून सुरुवात झाली. त्यात जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी आपला जिल्हाधिकारी पदाचा एक दिवसाचा सांकेतिक प्रभार आठव्या वर्गातील पुनम देशमुख या विद्यार्थिनीकडे देण्यात आला.

हेही वाचा...Periods मध्ये चहा बिलकुल पिऊ नका, वेदना कमी होतील मात्र वाढतील इतर समस्या

पाडळी येथे सरकारी शाळांमध्ये सातवीत 98 गुण मिळवणाऱ्या पूनम देशमूखला एक दिवस जिल्हाधिकारी होण्याचा मान मिळाला आहे. जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी पूनम देशमुख हिला पदभार सोपवून आपला हाताने जिल्हाधिकारी यांच्या खुर्चीवर बसवले. यावेळी पूनमने प्रशासकीय कामकाज कशा पद्धतीने चालवल्या जाते, याचा अभ्यास करत स्त्री शिक्षणासाठी भविष्यात प्रयत्न करण्याचा विश्वास व्यक्त केला. भविष्यात जिल्हाधिकारी होण्याचं ध्येय असल्याचं देखील पूनम देशमुख हिने यावेळी व्यक्त केलं आहे.

हेही वाचा...हेल्मेट घालाल तरच सुरू होणार बाईक, पेट्रोलचीही गरज पडणार नाही

प्रशासन लोकाभिमुख व्हावे, प्रशासकीय कामाला सामाजिकतेची जोड मिळावी या साठी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत 2 मार्चपासून सात दिवस गुणवत्ता प्राप्त विद्यार्थिनींना एक दिवसासाठी जिल्हाधिकारी बनविण्याचा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. बुलडाणा जवळच्या पाडळी गावातील पूनम देशमुख हिला जिल्हाधिकारी होण्याचा पहिला मान देण्यात आला. पूनम हिला इयत्ता सातवीत सर्वाधिक 98 टक्के गुण मिळाले आहे. त्याचबरोबर महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून या सप्ताहात जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात वेगवेगळे उपक्रम देखील राबविणार असल्याचे जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी सांगितले.

हेही वाचा...ATM मध्ये पैसे काढण्यासाठी मुलगा जाताच हल्लेखोराने साधला डाव, आईसोबत कलं असं

First published: March 2, 2020, 8:59 PM IST
Tags:

ताज्या बातम्या