शिरपूरमधील केमिकल फॅक्टरीत झालेल्या स्फोटाची भीषणता दाखणारे फोटो..

शिरपूरमधील केमिकल फॅक्टरीत झालेल्या स्फोटाची भीषणता दाखणारे फोटो..

शिरपूर (जि.धुळे) तालुक्यातील वाघाडी येथील केमिकल फॅक्टरीत आज (शनिवार) सकाळी भीषण स्फोट झाला. केमिकल फॅक्टरीत बॉयलर फुटून मोठा स्फोट झाला असून संपूर्ण परिसरात आग पसरली आहे.

  • Share this:

शिरपूर (जि.धुळे) तालुक्यातील वाघाडी येथील केमिकल फॅक्टरीत आज (शनिवार) सकाळी भीषण स्फोट झाला. केमिकल फॅक्टरीत बॉयलर फुटून मोठा स्फोट झाला असून संपूर्ण परिसरात आग पसरली आहे. यात 8 जणांचा मृत्यू झाला असून 35 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन चिमुरड्यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. स्फोट एवढा भीषण होता की, स्फोटामुळे दोन किलोमीटरपर्यंत जमीन हादरली. स्फोटाच्या तीव्रतेमुळे शिरपुरसह आजूबाजूची गावांनाही मोठा हादरा बसला...

या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असून 35 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन चिमुरड्यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरु आहे.

शिरपूर-शहादा महामार्गावर असलेल्या वाहाडी येथील केमिकल फॅक्टरीत स्फोट झाला. फॅक्टरीत 100 कामगार काम करत होते.

ही फॅक्टरी मुंबईच्या उमीत गृपने चालवण्यासाठी घेतली होता. ती आता गुजरातमधील व्यक्ती चालवत होता.

या फॅक्टरीत औषधीसाठी लागणारे केमिकल तयार केले जात होते. तीन शिफ्टमध्ये या फॅक्टरीचे काम चालत होते. शिफ्ट बदलण्याच्या वेळी ही घटना घडली आहे.

स्फोटाचा सर्वाधिक फटका वाघाडी गावाला बसला आहे. फॅक्टरी परीसरातील घरांची मोठी पडझड झाली आहे. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 31, 2019 12:57 PM IST

ताज्या बातम्या