मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अंडे फेकले, शाई तोंडाला फासली, धुळे पालिकेत राष्ट्रवादीचा तुफान राडा, LIVE VIDEO

अंडे फेकले, शाई तोंडाला फासली, धुळे पालिकेत राष्ट्रवादीचा तुफान राडा, LIVE VIDEO

कचरा संकलक ठेकेदारामुळे शहरात कचऱ्याचे ढिग साचले

कचरा संकलक ठेकेदारामुळे शहरात कचऱ्याचे ढिग साचले

धुळेकरांबद्दल अपशब्द वापरल्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले आणि व्यवस्थापकाला जाब विचारला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Dhule, India

धुळे, 21 मार्च : धुळे महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने राडा केल्याचा प्रकार समोर आला आहे. कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराच्या व्यवस्थापकालाचा काळे फासून मारहाण करण्यात आली आहे. या घटनेमुळे महापालिकेमध्ये एकच गोंधळ उडाला.

शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असताना नियमित स्वच्छता होत नसल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने आरोप केला. यासाठी राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आलं. पण, आंदोलनादरम्यान ठेकेदाराच्या व्यवस्थापकाने धुळेकर नागरिकांबद्दल अपशब्द वापरला.

धुळेकरांबद्दल अपशब्द वापरल्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले आणि व्यवस्थापकाला जाब विचारला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी व्यवस्थापकाला चोपललं. एवढंच नाहीतर व्यवस्थापकावर शाई आणि अंडेदेखील फेकण्यात आले. तसंच शिवीगाळ करत मारहाणही करण्यात आली. कचरा संकलक ठेकेदारामुळे शहरात कचऱ्याचे ढिग साचले असून, मनमानी करत असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप आहे. या घटनेमुळे पालिकेमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

महावितरणच्या गलथान कारभारांचा बीडकरांना फटका

दरम्यान, बीडमध्ये महावितरणच्या गलथान कारभाराचा शहरातील नागरिकांना फटका बसला आहे. सुरळीत वीजपुरवठा केला जात नसल्याने बीड माजलगाव धरणातून पाणी उपसा आणि पिंपळगाव मंजरा जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध होत नसल्याने, बीडकरांचा एक दिवसाने पाणीपुरवठा पुढे ढकलण्यात आला आहे.

(मुंबई-गोवा महामार्गाबाबत मोठी बातमी; काम युद्धपातळीवर, कधी होणार पूर्ण?)

बीड शहराला माजलगाव धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे, परंतु या धरणावर पाणी उपसा करण्यासाठी लावलेल्या विद्युत मोटारीला वीज मिळत नाही. मागील चार दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे, जलशुद्धीकरण केंद्रालाही वीजपुरवठा सुरळीत होत नाही. बीडकरांमधून संताप व्यक्त होत आहे. पालिकेने योग्य नियोजन करून तत्काळ महावितरणला पत्र देऊन सुरळीत वीजपुरवठ्याची मागणी करावी आणि होणारे हाल थांबवावेत, अशी मागणी होत आहे.

First published:
top videos

    Tags: Dhule