मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Breaking: विद्यार्थ्यांनो, अखेर 11वी प्रवेश परीक्षेचा फॉर्मुला ठरला; कधी आणि कशी होणार CET

Breaking: विद्यार्थ्यांनो, अखेर 11वी प्रवेश परीक्षेचा फॉर्मुला ठरला; कधी आणि कशी होणार CET

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वतः ट्विट करून यासंबंधीची माहिती दिली आहे.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वतः ट्विट करून यासंबंधीची माहिती दिली आहे.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वतः ट्विट करून यासंबंधीची माहिती दिली आहे.

मुंबई, 24 जून : कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा (10th and 12th exams) राज्य शासनाकडून रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Minister Varsha Gaikwad) यांनी दहावीचा निकाल (10th Result) जुलै महिन्यात लावण्यात येईल आणि अकरावीच्या (11th Admissions) प्रवेशासाठी CET (Common Entrance Test) म्हणजेच प्रवेश परीक्षा घेण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार आता राज्याच्या शिक्षण विभागाकडून अकरावी प्रवेशाच्या CET परीक्षेबाबतची माहिती देण्यात आली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वतः ट्विट करून यासंबंधीची माहिती दिली आहे.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलेल्या ट्विटनुसार इयत्ता दहावीचा निकाल 15 जुलैपर्यंत लागण्याची शक्यता आहे. तर अकरावीची दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. जुलै महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला ही परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असणार आहे.

कशी होणार प्रवेश परीक्षा

CET  म्हणजेच अकरावीची प्रवेश परीक्षा विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना जुनिअर कॉलेजमध्ये (Junior College) प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासठी ही परीक्षा असणार आहे.

ही परीक्षा पूर्णपणे दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे.

एकूण 100 मार्कांची ही परीक्षा असणार आहे. यात  इंग्रजी (English), गणित (Maths), विज्ञान (Science) आणि  सामाजिक शास्त्र (Social Science)  या विषयांवर प्रत्येकी 25 मार्कांचे प्रश्न असणार आहेत.

प्रवेश परीक्षेसाठी 100 गुणांची एकच प्रश्नपत्रिका असणार आहे. परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असणार आहे.

परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची यादी राज्य मंडळ किंवा परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात येणार आहे.

CET प्रवेश परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं (Offline exam) घेतली जाणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर जाऊन ही परीक्षा द्यावी लागणार आहे.

या परीक्षेतील गुणांच्या आधारावर अकरावीचे प्रवेश निश्चित केले जाणार आहेत.

ज्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेचं शुल्क भरलंय त्यांच्याकडून CET साठी शुल्क आकारण्यात येणार नाही.

जे विद्यार्थी ही प्रवेश परीक्षा देऊ इच्छित नाही त्यांना परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनंतर अकरावीत प्रवेश मिळणार आहे. त्यांचं मूल्यमापन हे दहावीच्या गुणांच्या आधारे होणार आहे.

First published:

Tags: 10th class