मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज्यात लवकरच शिक्षण भरती, Tweet करुन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली मोठी घोषणा

राज्यात लवकरच शिक्षण भरती, Tweet करुन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली मोठी घोषणा

 पालकांसाठी सूचना देत आहोत की, आपल्या पाल्याला युनिफॉर्म घालणे, घरी येऊन काळजी घेण्याची पूर्ण खबरदारी घ्यायची आहे

पालकांसाठी सूचना देत आहोत की, आपल्या पाल्याला युनिफॉर्म घालणे, घरी येऊन काळजी घेण्याची पूर्ण खबरदारी घ्यायची आहे

लवकरच राज्यात शिक्षण विभागात (Education department) शिक्षक भरती होणार आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 03 सप्टेंबर: राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (State Education Minister Varsha Gaikwad) यांनी मोठी घोषणा केली आहे. लवकरच राज्यात शिक्षण विभागात (Education department) शिक्षक भरती होणार आहे. ट्विट (Tweet) करुन वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे.

राज्यातल्या शिक्षण विभागात एकूण 2062 जागांसाठी शिक्षक भरतीची प्रक्रिया होणार आहे. यामध्ये शिक्षण विभागाकडून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आलेल्या उमेदवारांपैकी 3902 उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात आली आहे.

वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत घोषणा केली की, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 561 खाजगी व्यवस्थापनाच्या 2062 रिक्त पदांसाठी 15123 पसंतीक्रमावर 3902 उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात येत आहे. उमेदवारांना मुलाखतीसाठी हार्दिक शुभेच्छा!”

हेही वाचा- Tokyo Paralympics : प्रवीण कुमारची ऐतिहासिक उडी, भारताची आणखी एका मेडलची कमाई 

राज्यात 40 हजार पदे रिक्त

राज्यात सद्यस्थितीत एकूण 40 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे 13 हजार अशी एकूण 40 हजार पदे रिक्त आहेत. टप्प्याटप्प्यानं शिक्षण विभागात ही जागा भरणार आहे. पहिल्या टप्प्यात 6100 जागा भरण्यात येईल.

First published:

Tags: Varsha gaikwad