मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /ईडीची पुढची कारवाई नांदेडमध्ये? चंद्रकांत पाटलांनी दिले संकेत

ईडीची पुढची कारवाई नांदेडमध्ये? चंद्रकांत पाटलांनी दिले संकेत

 ' मला या गोष्टी कशा माहिती होतात तर मी अंतरज्ञानी आहे'

' मला या गोष्टी कशा माहिती होतात तर मी अंतरज्ञानी आहे'

एकीकडे सत्ताधारी पक्षाकडून भाजपचेच नेते केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करत असल्याचा आरोप करत आहे. तर चंद्रकांत पाटील यांनी उघडपणे...

नांदेड, 19 ऑक्टोबर :  महाविकास आघाडी सरकारमधील (mva government) अनेक नेत्यांना या ना त्या आरोपांमध्ये चौकशीला समोरं जाव लागत आहे. एकीकडे सत्ताधारी पक्षाकडून भाजपचेच नेते केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करत असल्याचा आरोप करत आहे. तर या पुढची ईडीची कारवाई नांदेडमध्ये होणार असल्याचे संकेतच खुद्द भाजपाचे प्रदेशाअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. तुम्हाला माझ्या हसण्याचा काय अर्थ काढायचा तो काढा? असंही पाटील सांगून मोकळे झाले आहे.

नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभेची पोट निवडणूक (nanded deglur bypoll election) होत आहे.  राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (ashok chavan) यांनी या निवडणुकीसाठी आपली प्रतिष्ठापणाला लावली आहे. तर भाजपाने देखील जोर लावला. याच काळात महाविकास आघाडीच्या नेत्याजवळच्या लोकांवर सध्या  केंद्रीय तपास यंत्रणाच्या  कारवाया सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये एका व्यापाऱ्याच्या कार्यालयात देखील आयकर विभागाने धाड टाकली.  ईडी किंवा आयकर विभागाची आता पुढची कारवाई नांदेडच्या नेत्यावर होणार का? असा प्रश्न भाजपाचे  प्रदेशअध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांना विचारला असता त्यांनी अप्रत्यक्षपणे तसे  संकेत दिले.

“तो त्याच्याच माणसांशी दगाबाजी करतो” ; उत्कर्ष - जयचा रोख कोणाकडे ?

'मी काही त्या तपास यंत्रणाचा अधिकारी  नाही. पण माझ्या हसण्यावरून तुम्ही समजून घ्या' असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे अप्रत्यक्षपणे बोट केलं.

विशेष म्हणजे, नांदेडमधील देगलूर पोटनिवडणूक सुरू आहे. भाजपने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी दिली. भाजपने उमेदवार आयात केल्याने काँग्रेसला ही निवडणूक जड जाणार होती. त्यात अशोक चव्हाण यांनी देखील खेळी केली. माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांना काँग्रेसमध्ये आणलं.  भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये गेल्याने भाजपा चांगलच धक्का लागला. खतगावकर यांच्या निर्णयानंतर भाजपाचे चंद्रकांत पाटील तातडीने देगलूरला आले.

LPG Subsidy! केवळ गरीबांनाच अनुदान देण्याचा मोदी सरकारचा विचार

'निवडणुकीच्या काळात अनेक नेते पक्ष बदलतात . खतगावकर यांनी देखील पक्ष बदलला. ते काँग्रेसमध्ये गेले नसते तर मला प्रचाराला यायची वेळ आली नसती. त्यांच्या मुळे देगलूरची निवडणूक जड जाणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी मान्य केले. पण तरीही ही निवडणूक आम्ही जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देगलूर मतदारसंघात खतगावकर यांचं वजन आहे. आता ते काँग्रेसमध्ये आल्याने भाजपला ही निवडणूक जड जाणार आहे. त्यामुळे आता चंद्रकांत पाटील यांनीही थेट ईडीच्या कारवाईचे संकेत देऊन खळबळ उडवून दिली आहे.

First published:
top videos

    Tags: Chandrakant patil, ED