अशोक चव्हाण अडचणीत, पुन्हा 'आदर्श' चौकशी सुरू

अशोक चव्हाण अडचणीत, पुन्हा 'आदर्श' चौकशी सुरू

बुधवारी कुलाब्यातील आदर्श सोसायटीमध्ये ईडीचे पथक पोहचले. आदर्श सोसायटीमध्ये पथकाकडून चौकशी करण्यात येत आहे.

  • Share this:

मुंबई, 28 नोव्हेंबर : राज्यात महाआघाडीच्या सरकारचा आज शपथविधी शिवाजी पार्कवर होणाार आहे. शिवसेना, राष्ट्रावादी आणि काँग्रेससह मित्रपक्षांच्या या आघाडीने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं आहे. गुरुवारी उद्धव ठाकरेंसह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे दोन मंत्री शपथ घेतील असं म्हटलं जात आहे. उद्धव ठाकरेंच्या या मंत्रिमंडळात काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हेसुद्धा शपथ घेतील.

दरम्यान, शपथविधीआधीच अशोक चव्हाण यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आदर्श सोसायची घोटाळ्याची सक्तवसुली संचालनालयाने पुन्हा चौकशी सुरु केली आहे. बुधवारी कुलाब्यातील आदर्श सोसायटीमध्ये ईडीचे पथक पोहचले. आदर्श सोसायटीमध्ये पथकाकडून चौकशी करण्यात येत आहे.

कारगिल युद्धातील विधवांसाठी तयार झालेल्या आदर्श सोसायटीत नातेवाईकांना फ्लॅट दिल्याप्रकरणी घोटाळ्यात अशोक चव्हाणांचं नाव अडकलं आणि त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं. आदर्श घोटाळा 2010 मध्ये समोर आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2019 10:44 AM IST

ताज्या बातम्या