मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

संजय राऊत गोत्यात, आमदार भावाच्या परिसरात ईडीचे छापे, जेलमध्ये मुक्काम वाढणार?

संजय राऊत गोत्यात, आमदार भावाच्या परिसरात ईडीचे छापे, जेलमध्ये मुक्काम वाढणार?

या बिल्डराचे बहुतांश बांधकाम हे संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत यांच्या मतदारसंघातले आहे.

या बिल्डराचे बहुतांश बांधकाम हे संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत यांच्या मतदारसंघातले आहे.

या बिल्डराचे बहुतांश बांधकाम हे संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत यांच्या मतदारसंघातले आहे.

  • Published by:  sachin Salve
मुंबई, 18 ऑगस्ट : पत्राचाळ मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आता ईडीने (ed) मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले. राऊत यांच्या निकटवर्तीय असलेल्या मुंबईतील एका बिल्डरसह अन्य काही ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांची छापे मारले. त्यामुळे राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहे. पत्राचाळ प्रकरणामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) सध्या न्यायालयीन कोठडी असून ऑर्थर रोडमध्ये मुक्कामी आहे. या प्रकरणात बुधवारी ईडीने (ed) मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. संजय राऊत यांच्या निकटवर्तीय बिल्डरवर हे छाप टाकण्यात आले. राऊत यांच्या निकटवर्तीय असलेल्या मुंबईतील एका बिल्डरसह अन्य काही ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकून झाडाझडती घेतली. मुलुंड येथील श्रद्धा बिल्डर कंपनीवर बुधवारी ईडीने छापेमारी केल्याचे समजते. कंपनीची कागदपत्रे तसंच संगणकाची देखील तपासणी करण्यात आली. श्रद्धा बिल्डर यांचे बरेचसे बांधकाम हे विक्रोळी, भांडुप, मुलुंड परिसरात आहे. विशेष म्हणजे, या बिल्डराचे बहुतांश बांधकाम हे संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत यांच्या मतदारसंघातले आहे. त्यामुळे राऊत यांच्याविरोधात ईडीच्या हाती महत्त्वाची माहिती लागण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर राऊत यांना पु्न्हा एकदा कोर्टात हजर केले जाणार आहे. त्यावेळी ईडी काय आरोप करते हे पाहण्याचे ठरणार आहे. काय आहे प्रकरण? मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे. पत्राचाळ परिसरातील 672 कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी 2008 मध्ये मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्सची रहिवाशांनी नियुक्ती केली. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळमधील तीन हजार फ्लॅट बांधकाम करून 672 फ्लॅट भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायचे होते. मात्र 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे काही शेअर एचडीआयएलला विकले. (Farmer Rain Damage : शिंदे सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणार, जुन्या पद्धतीनेच अतिवृष्टीची नुकसान भरपाई देणार) या प्रकरणातील पैसा नेमका कुठे गेला यासंदर्भात ईडीने केलेल्या तपासामध्ये प्रवीण राऊत यांच्या नावाने एचडीआयएलमधून 100 कोटी वळवण्यात आल्याचं समोर आलं. 2010 मध्ये या आर्थिक घोटाळ्यातील 55 लाखांची रक्कम ही प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी राऊत यांच्या खात्यावरुन वर्षा राऊत यांच्या खात्यावर वळवण्यात आली. वर्षा राऊत या संजय राऊत यांच्या पत्नी आहेत. वर्षा यांनी ही रक्कम दादरमधील फ्लॅट घेण्यासाठी वापरल्याचा दावा ईडीने केला.
First published:

पुढील बातम्या