'तुर्ताच चौकशीची गरज नाही', पवार प्रकरणात ED बॅकफूटवर?

'तुर्ताच चौकशीची गरज नाही', पवार प्रकरणात ED बॅकफूटवर?

ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली.

  • Share this:

मुंबई, 27 सप्टेंबर : ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली. ईडी प्रकरणात नाव आल्यामुळे आता नोटीस आलेली नसताना शरद पवार स्वत: ईडी कार्यालयात जाणार आहेत. मात्र आता ईडीने पत्र पाठवत तुम्हाला तुर्तास चौकशीसाठी येण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणात ईडी बॅकफूटवर गेली आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने शरद पवारांवर गुन्हा दाखल केल्याच्या बातम्या समोर आल्या. ईडीनेही हे वृत्त फेटाळलं नाही. ज्या बँकेचे शरद पवार कधीही संचालक नव्हते, त्या बँकेतील घोटाळ्याबाबत त्यांच्यावर गुन्हा का दाखल केला, असं म्हणत राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. ईडी जरी म्हणत असेल चौकशीची आताच गरज नाही तरीही शरद पवार ईडी कार्यालयात जाऊन या प्रकरणाबाबत माहिती घेतील, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेची पॉवर पवारांच्या पाठीशी!

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांची पाठराखण केली आहे. शरद पवार यांचं या घोटाळ्यात कधीही नाव आलं नव्हतं, मग आता गुन्हा का दाखल करण्यात आला, असा सवाल त्यांनी केला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यानंतर आता शिवसेनेनंही शरद पवारांना क्लीन चिट दिल्याने राष्ट्रवादीला दिलासा मिळाला आहे.

ईडी कार्यालयात जाण्यावर पवार ठाम

शरद पवार अद्यापही ईडी कार्यालयात जाण्याबाबत ठाम आहेत. त्यामुळे दुपारी 2 वाजता ते ईडीच्या कार्यालयात जातील. या पार्श्वभूमीवर फोर्ट परिसरात 144 कलाम लागू करण्यात आलं आहे. शरद पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ईडी कार्यालयासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. त्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Published by: Akshay Shitole
First published: September 27, 2019, 1:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading