Home /News /maharashtra /

BREAKING : माढ्यात पोहोचली ईडी, राष्ट्रवादीच्या आमदाराची मुलासह केली चौकशी?

BREAKING : माढ्यात पोहोचली ईडी, राष्ट्रवादीच्या आमदाराची मुलासह केली चौकशी?

  बबनराव शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांची मागील दोन महिन्यापासून तीन वेळा चौकशी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली

बबनराव शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांची मागील दोन महिन्यापासून तीन वेळा चौकशी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली

बबनराव शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांची मागील दोन महिन्यापासून तीन वेळा चौकशी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली

सोलापूर, 03 एप्रिल : महाविकास आघाडी सरकारच्या (mva government) मंत्री आणि नेत्यांमागे ईडीचा (ed) ससेमिरा कायम आहे. आता राष्ट्रवादीचे  सोलापूर जिल्ह्यातील माढ्याचे आमदार बबनराव शिंदे ( NCP MLA Baban Shinde ) आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे ( Ranjit Singh Shinde) यांची ईडीकडून चौकशी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या चौकशीमुळे माढ्यात खळबळ उडाली आहे. माढ्याचे आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांची ईडीकडून चौकशी झाल्याची माहिती समोर आली आहे.  साखर कारखान्यातील शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज उचलण्यासह विविध विषयात ईडीकडून चौकशी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. साखर कारखान्याचे हे संपूर्ण प्रकरण 500 कोटींच्या घरात जात असल्याची माहिती समोर आली आहे. (उल्कापिंड की चीनी सॅटेलाईट? महाराष्ट्रात दिसलेला रहस्यमयी आगीचा गोळा नेमका कसला) बबनराव शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांची मागील दोन महिन्यापासून तीन वेळा चौकशी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. साखर कारखान्यातील शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज उचलण्यासह विविध विषयात ईडीकडून चौकशी केली आहे. दरम्यान, कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत असताना शरद पवार यांनी ईडीच्या कारवाईवरून भाजपवर टीका केली. (VIDEO : 8 KM रुग्णवाहिकेच्या मागे धावत राहिला घोडा; कारण जाणून व्हाल भावुक) 'ईडी हा शब्द कुणाला माहीत होती का? आज याच्या घरी उद्या त्याच्या घरी जातात. आम्ही तुमच्याकडे येणार आहोत रस्त्यात काहीतरी उभा करास असं सांगितलं जातं असं ऐकायला मिळतंय. काहीतरी आर्थिक घडामोडी घडत आहेत असं ऐकायला मिळत आहे यावर केंद्र सरकारने नियंत्रण आणले पाहिजे, असंही शरद पवार म्हणाले. 'आमच्यात कुणाचं काय व्हावं याची चिंता भाजपला काय आम्ही तिन्ही एकत्र आहोत. लोकांना सत्तेचा गैरवापर आवडत नाही. नेत्यांपेक्षा नागरिकांमध्ये लोकशाही बद्दल जास्त प्रेम असतं. एका पोलीस अधिकाऱ्याच्या आरोपावरून कारवाई केली जाते. कुणाच्या तरी सांगण्यावरून कारवाई केली जाते हे लोकांना समजत याचा परिणाम येणाऱ्या काळात दिसून येईल, असं सूचक वक्तव्य शरद पवारांनी केलं.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या