मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /PMLA कोर्टाने ईडीची मागणी फेटाळल्यानंतरही धाकधूक कायम, संजय राऊतांच्या अडचणी पुन्हा वाढणार?

PMLA कोर्टाने ईडीची मागणी फेटाळल्यानंतरही धाकधूक कायम, संजय राऊतांच्या अडचणी पुन्हा वाढणार?

संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. तसेच पीएमएलए कोर्टाने राऊत यांच्या जामिनाच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याची ईडीची मागणी देखील फेटाळून लावली आहे. मात्र आता ईडीने याविरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे.

संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. तसेच पीएमएलए कोर्टाने राऊत यांच्या जामिनाच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याची ईडीची मागणी देखील फेटाळून लावली आहे. मात्र आता ईडीने याविरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे.

संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. तसेच पीएमएलए कोर्टाने राऊत यांच्या जामिनाच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याची ईडीची मागणी देखील फेटाळून लावली आहे. मात्र आता ईडीने याविरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : पीएमएलए न्यायालयाने जामिनाच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळून लावत संजय राऊत यांना मोठा दिलासा दिला आहे. पीएमएलए न्यायालयाच्या या निर्णयानंतर संजय राऊत यांच्या सुटकेचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. संजय राऊत यांची सुटका होणार असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून, राऊत यांच्या निवासस्थानी उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. मात्र दुसरीकडे ईडीने  पीएमएलए न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेतल्यानं संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

ईडीची हायकोर्टात धाव 

पीएमएलए कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी या मागणीसाठी आता ईडीने हायकोर्टात धाव घेतली आहे. अटर्नी जनरल अनिल सिंह हे हायकोर्टात पोहोचले आहेत. आज साडेचार वाजता या याचिकेवरील सुनावणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. साडेचार वाजेपर्यंत संजय राऊत हे देखील हायकोर्ट परिसरातच आहेत. त्यामुळे आता हायकोर्ट काय निर्णय देणार? पीएमएलए कोर्टाचा निर्णय कायम ठेवला जाणार की संजय राऊत यांच्या जामिनाबाबत वेगळा काही निर्णय येणार याकडे आता सर्वांच लक्ष लागलं आहे.

काय आहे ईडीची मागणी 

संजय राऊत यांच्या जामिनाला ईडीचा विरोध आहे. मात्र दुसरीकडे पीएमएलए कोर्टाने राऊत यांचा जामीन मंजूर करत ईडीला धक्का दिला. त्यानंतर ईडीने पुन्हा एकदा राऊत यांच्या जामिनाच्या अंमलबजावणीला एका आठवड्याची स्थगिती देण्यात यावी अशी मागणी पीएमएलए कोर्टाकडे केली होती. मात्र कोर्टाने ईडीची ही मागणी देखील फेटाळली आहे.

मागणी फेटाळली

आम्ही संजय राऊत यांना जामीन देण्याच्या कोर्टाच्या निर्णयाचा आदर करतो. मात्र आम्हाला याविरोधात आता हायकोर्टात आपील करायचे असल्यानं राऊत यांच्या जामिनाच्या अंमलबाजवणीला एका आठवड्याची स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी ईडीने न्यायालयात केली होती. मात्र न्यायालयाने ईडीची मागणी फेटाळून लावली. मागणी फेटाळल्यानंतर आता ईडीने लगेचच हायकोर्टात धाव घेतली आहे. ईडीच्या याचिकेवर आज साडेचार वाजेपर्यंत सुनावणी होण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटात उत्साह 

दरम्यान दुसरीकडे संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर ठाकरे गटात उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. संजय राऊत यांच्या  निवासस्थानी कार्यकर्ते जमा होण्यास सुरुवात झाली असून, उत्सवाची तयारी सुरू झाली आहे.

First published:
top videos

    Tags: Court, ED, High Court, Sanjay raut