बारामतीत शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर; शरद पवारांवरील कारवाईनंतर 'बंद'ची हाक

बारामतीत शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर; शरद पवारांवरील कारवाईनंतर 'बंद'ची हाक

शरद पवार यांचं होम ग्राऊंड असलेल्या बारामती शहरात शाळा, कॉलेजसह दुकानेही बंद ठेवण्यात आली आहेत.

  • Share this:

बारामती, 25 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. राजकीय सूडबुद्धीतून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने सरकारवर हल्लाबोल केला आहे. तर शरद पवार यांचं होम ग्राऊंड असलेल्या बारामती शहरात शाळा, कॉलेजसह दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.

शरद पवार यांच्यावरील कारवाईचा निषेध करत बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान, तुळजाराम चतुरचंद या महाराविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. तसंच औद्योगिक वसाहतीतील कामगारांनीही या बंदला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शहरात आज दिवसभर शरद पवार यांच्यावरील कारवाईचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण?

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच EDने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकांमधील घोटाळ्याशी संबंधित आरोपांवर हा गुन्हा दाखल झाला. यातल्या अन्य आरोपींमध्ये दिलीपराव देशमुख, ईशरलाल जैन, जयंत पाटील, शिवाजीराव नलवडे, शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा समावेश आहे. सहकारी साखर कारखान्यांना कर्ज वितरणात अनियमितता असल्याचा आरोप आहे. कमकुवत आर्थिक स्थिती असूनही सहकारी साखर कारखान्यांना कर्ज मंजूर करण्यात आली होती. बऱ्याच प्रकरणांमध्ये कोणत्याही तारणविना कर्ज मंजूर केले गेलं होतं, असा आरोप आहे.

'मी संचालक नसलेल्या बँक प्रकरणात माझं नाव गोवलं, कारवाईचं स्वागतच'

ईडीच्या कारवाईनंतर शरद पवार यांनी भाजप सरकारला टोला लगावत सर्व आरोप फेटाळत आहेत. 'मी कधीही कोणत्या सहकारी बँकेचा संचालक नव्हतो. असं असताना माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या कारवाईचं मी स्वागतच करतो. मी महाराष्ट्रभर करत असलेल्या दौऱ्याला जो प्रतिसाद मिळत आहे, त्यानंतर अशी कारवाई होणं अपेक्षितच होतं,' असं म्हणत शरद पवारांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

VIDEO : शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे एकनाथ खडसेंनी व्यक्त केलं आश्चर्य, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 25, 2019 09:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading