...तर शरद पवार यांच्या अडचणी आणखी वाढणार

या प्रकरणात शरद पवार यांच्या अडचणीत आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 25, 2019 11:09 AM IST

...तर शरद पवार यांच्या अडचणी आणखी वाढणार

मुंबई, 25 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेत सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप केला आहे. पण या प्रकरणात शरद पवार यांच्या अडचणीत आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर केंद्रीय दक्षता आयोगानेही बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांच्यासह तत्कालीन संचालकांची चौकशी करण्याचे आदेश नाबार्डला दिल्याची माहिती आहे. त्यामुळे सहकारी बँक प्रकरणात राष्ट्रवादीच्या अडचणी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. याबाबत 'लोकमत'ने वृत्त दिलं आहे.

'कारवाई होणार असेल तर स्वागत करतो'

ईडीच्या कारवाईनंतर शरद पवार यांनी भाजप सरकारला टोला लगावत सर्व आरोप फेटाळत आहेत. 'मी कधीही कोणत्या सहकारी बँकेचा संचालक नव्हतो. असं असताना माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या कारवाईचं मी स्वागतच करतो. मी महाराष्ट्रभर करत असलेल्या दौऱ्याला जो प्रतिसाद मिळत आहे, त्यानंतर अशी कारवाई होणं अपेक्षितच होतं,' असं म्हणत शरद पवारांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्रभरात राष्ट्रवादीची आक्रमक भूमिका

Loading...

शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हे दाखल केल्यानंतर शरद पवार यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राष्ट्रवादीने सोशल मीडियावर मोहीम सुरू केली आहे.

शरद पवार यांच्या फोटोसह 'आय सपोर्ट शरद पवार' असा मजकूर राष्ट्रवादीकडून व्हायरल करण्यात येत आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून राष्ट्रवादी रान पेटवण्याची चिन्ह आहेत.

VIDEO : शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे एकनाथ खडसेंनी व्यक्त केलं आश्चर्य, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 25, 2019 10:58 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...