भाजपच्या जवळच्या नेत्याच्या मालमत्तेवर EDचे छापे; शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज लाटल्याचा आरोप

भाजपच्या जवळच्या नेत्याच्या मालमत्तेवर EDचे छापे; शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज लाटल्याचा आरोप

ED Raid : रत्नाकर गुट्टेंशी संबंधित 9 ठिकाणी ईडीचे छापे

  • Share this:

मुंबई, 06 जून : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीनं आता कारवाईला सुरूवात केली आहे. ईडीनं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि भाजपच्या जवळ असलेल्या रत्नाकर गुट्टे यांच्याशी संबंधित 9 ठिकाणी छापे मारले आहेत. रत्नाकर गुट्टेंशी संबंधित परभणी, नागपूर आणि मुंबईतील ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. छापेमारीमध्ये मुंबईतील वांद्रे येथील शिक्षण संस्थेचा देखील समावेश आहे. रत्नाकर गुट्टे यांनी 2298 शेतकऱ्यांच्या नावे सहा बँकांकडून तब्बल 328 कोटींचं कर्ज घेतलं. पण, यातील बहुतांश शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे.

काय आहे सारं प्रकरण?

साखर सम्राट असलेल्या रत्नाकर गुट्टे यांनी सहा बँकांकडून 2298 शेतकऱ्यांच्या नावे 328 कोटींचं कर्ज घेतलं. कर्ज घेतलेल्या बँकांमध्ये आंध्र बँक, य़ुको बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, सिंडीकेट बँक आणि आरबीएल बँकेचा समावेश आहे. बँकांकडून 328 कोटींचं कर्ज घेताना गुट्टे यांनी सादर केलेल्या कागदपत्रांमधील बहुतांश शेतकरी हे मृत्यू पावलेले आहेत. त्यांच्या नावे कर्ज घेतल्याप्रकरणी ईडीनं ही छापेमारी केली आहे. यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, संपर्क मात्र झाला नाही.

....म्हणून इम्रान खान यांच्याशी चर्चा करणार नाहीत पंतप्रधान मोदी

गुट्टे भाजपच्या जवळचे

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते असलेले रत्नाकर गुट्टे हे भाजपच्या जवळचे देखील आहेत. द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या चित्रपटाचे डिरेक्टर असलेल्या विजय गुट्टे यांचे रत्नाकर गुट्टे हे वडील देखील आहेत. GSTमध्ये 34 कोटींचा घोटाळा केल्यानं विजय गुट्टे यांना ऑगस्ट 2018मध्ये अटक देखील करण्यात आली होती.

प्रकाश मेहता प्रकरणावर फडणवीसांची प्रतिक्रिया

First published: June 6, 2019, 7:55 PM IST
Tags: ED

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading