Home /News /maharashtra /

पैशाचं सोंग आणायचं कसं? राज्याची आर्थिक घडी विस्कटली!

पैशाचं सोंग आणायचं कसं? राज्याची आर्थिक घडी विस्कटली!

अपुरा झालेला पाऊस, कर्जमाफीमुळं राज्याच्या तिजोरीवर पडलेला बोजा, उद्योगधंद्यात अपेक्षेप्रमाणं न झालेली वाढ आणि उत्पन्नाची मर्यादीत साधणं यामुळं राज्याचं आर्थिक गणित बिघडल्याचं आर्थिक पाहणी अहवालात स्पष्ट झालंय.

मुंबई, 08 मार्च : यावर्षी अपुरा झालेला पाऊस, कर्जमाफीमुळं राज्याच्या तिजोरीवर पडलेला बोजा, उद्योगधंद्यात अपेक्षेप्रमाणं न झालेली वाढ आणि उत्पन्नाची मर्यादीत साधणं यामुळं राज्याचं आर्थिक गणित बिघडलं आहे. आज जाहीर झालेल्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात महाराष्ट्राचं आर्थिक गणित बिघडल्याचं स्पष्ट झालंय. राज्याच्या उत्पन्नापेक्षा खर्च वाढत असल्याने पैशाचं सोंग आणायचं कसं असा गंभीर प्रश्न अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पडलाय. राज्याचा अर्थसंकल्प उद्या विधिमंडळात सादर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधिमंडळात आज आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. राज्याचं उत्पन्न 2 लाख 43 हजार कोटींवर गेलं असून खर्च 2 लाख 43 हजार कोटींवर गेलाय. त्यामुळं वित्तीय तूट 4511 कोटी रूपयांवर गेली आहे. आर्थिक पाहणी अहवालातील ठळक मुद्दे - राज्य सरकारवर 4 लाख 12 हजार कोटीचं कर्ज - आर्थिक ताळेबंदात साडेचार हजार कोटींची तूट - आर्थिक करवसुलीतील तूट 35 हजार कोटींवर - उद्योग क्षेत्रात मंदी, पाऊसमान कमी ही तुटीची कारणं - पाऊस कमी पडल्याने, कृषी उत्पन्नातही मोठी तूट - विकासदर गेल्यावर्षीच्या तुलनेत 2.7 टक्क्यांनी घसरला - विकासदरात गेल्या वर्षीच्या तुलनेत ७.३ वाढ अपेक्षित
First published:

Tags: Maharashtra, Sudhir mungantiwar, सुधीर मुनगंटीवार

पुढील बातम्या