विनय राऊत (प्रतिनिधी)पालघर, 14 डिसेंबर: पालघरमध्ये शुक्रवारी रात्रीपासून भूकंपाचे धक्के बसत आहेत. डहाणू, तलासरी, पालघर इथल्या काही भागांमध्ये सौम्य तर काही तालुक्यात मध्यम स्वरूपाची तीव्रता असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पालघरमधल्या काही भागांमध्ये शनिवारी पाहाटे 4.8 रिश्टर स्केल भूकंपाचे हारदे बसले. आतापर्यंतची सर्वाधिक तीव्रता असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
India Meteorological Department: An earthquake of magnitude 4.8 on the Richter scale hit Palghar, at 5:22 am, today. #Maharashtra
शुक्रवारी रात्रीपासून 3.7 रिश्तर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंपाचे धक्के बसले होते. कासा आणि दापचरी भागात तीव्र भुकंपाचे झटके अनुभवायला मिळाले. गेले २ वर्षे पालघर जिल्ह्याला सतत भूकंपाचे हादरे बसत आहेत. त्यापैकी आज पहाटे झालेला हा मोठा भूकंपाचा धक्का आहे. हा 12 तासातला दुसरा मोठा भूकंपाचा धक्का होता. साधारण पहाटे 5 वाजून 22 मिनिटांनी याची तीव्रता अधिक असल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं आहे.
भूकंपाच्या धक्क्यांमुळे अनेक घरांमधील भिंतींना तडे गेले आहेत. तर सातत्यानं होणाऱ्या भूकंपानं शाळेतील मुलांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.