मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पालघर पुन्हा हादरलं, डहाणू आणि तलासरीला बसले भूकंपाचे 8 धक्के

पालघर पुन्हा हादरलं, डहाणू आणि तलासरीला बसले भूकंपाचे 8 धक्के

पालघर जिल्ह्यात भूकंपाची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही आहे. पालघर जिल्हा मंगळवारी भूकंपाच्या धक्क्यानं हादरला आहे.

पालघर जिल्ह्यात भूकंपाची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही आहे. पालघर जिल्हा मंगळवारी भूकंपाच्या धक्क्यानं हादरला आहे.

पालघर जिल्ह्यात भूकंपाची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही आहे. पालघर जिल्हा मंगळवारी भूकंपाच्या धक्क्यानं हादरला आहे.

पालघर,10 मार्च:पालघर जिल्ह्यात भूकंपाची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही आहे. पालघर जिल्हा मंगळवारी भूकंपाच्या धक्क्यानं हादरला आहे. डहाणू आणि तलासरी या भागांत दोन दिवसांत जवळपास 13 भूकंपाचे धक्के बसले आहेत. भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तलासरी, डहाणूत भूकंपाचे सत्र सुरूच आहे. सोमवारी, मंगळवारी भुकंपाचे धक्के जाणवल्याने पालघर जिल्ह्यातील बहुतांश गावे पुन्हा भयभीत झाले आहेत. 9 मार्च रोजी पहाटे 4 वाजता 2.0 रिश्टरचा, त्यानंतर लगेच 05 वाजून 18 मिनिटांला 2.3 रिश्टरचा धक्का बसला. रात्री 8 वाजून 45 मिनिटांला 2.4 रिश्टरचा तर 8 वाजून 47 मिनिटांला 2 रिश्टरचा धक्का बसला. आज (10 मार्च) पहाटेही चार धक्के बसले. मध्यरात्री 1 वाजून 24 मिनिटांला 2.8 रिश्टरचा, पहाटे 5 वाजून 47 वाजता 2.7 रिश्टरचा, सकाळी 6 वाजून 21 मिनिटांला 2.0 रिश्टरचा तर सकाळी 9 वाजून 48 मिनिटांला 1.9 रिश्टरचा धक्का बसला.

सलग दोन दिवस भूकंपाचे लहान-मोठे आठ हादरे बसल्याने नागरिकांत भीतीचं वातावरण पसरलं आहे.

हेही वाचा..ज्योतिरादित्य शिंदे यांचा राजीनामा, मात्र सचिन पायलट ट्रेंडिंगमध्ये!

भूकंपापासून बचावासाठी अनोखं प्रशिक्षण

मुंबईपासून अवघ्या 130 किलोमीटर अंतरावर असलेल्या पालघरमध्ये आतापर्यंत अनेकवेळा झालेल्या भूकंपांमुळे पालघर जिल्ह्यातील जनता मोठ्या दहशतीत आहे. पालघरमध्ये आतापर्यंत जवळपास हजारच्यावर सौम्य ते तीव्र स्वरूपाचे भूकंपाचे धक्के बसले आहे. तर सगळ्यात तीव्र धक्का 4.1 रिश्टल स्केल होता. पालघर जिल्ह्यतील डहाणू आणि तलासरी या तालुक्यांना भूकंपाचा धोका आतापर्यंत सर्वात जास्त वेळा जाणवला आहे. आतापर्यंत झालेल्या भूकंपांमध्ये 2 जणांचा बळीही गेला आहे. तर स्थावर मालमत्तांचं मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. तलासरी आणि डहाणू तालुक्यातील लोक मोठ्या प्रमाणावर भीतीच्या छायेखाली जगत आहेत. मध्यंतरी काही काळ या गावकऱ्यांनी तर रात्री मैदानांवर झोपून काढल्या. विद्यार्थ्यांच्या शाळाही मैदानात भरत होत्या. अशी या भूकंपाची सगळ्यांनी दहशत घेतली आहे. केंद्राचे भूगर्भ अभ्यासक पालघरमध्ये येऊन याची पाहणीही करून गेले. मात्र हे भूकंप का आणि कशामुळे होतात त्याच्यावर अजूनही अभ्यास सुरू आहे.

हेही वाचा..‘महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत होणार बंडखोरी ’

आता भूकंप झालाच तर त्याच्याशी दोन हात करण्याचं पालघरवासीयांनी ठरवलं आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शालेय पातळीवर विद्यार्थ्यांना भूकंपातून संरक्षणाचं विशेष प्रशिक्षण द्यायचा निर्णय घेतला. भूकंपापासून वाचण्यासाठी पालघरमधील मुलांना एक अनोखं ट्रेनिंग देण्यात आलं आहे.

First published:

Tags: Earthquake