पश्चिम महाराष्ट्रात भूकंपाचे सौम्य धक्के

पश्चिम महाराष्ट्रात भूकंपाचे सौम्य धक्के

  • Share this:

04 जून : कोयना धरण परिसरासह पश्चिम महाराष्ट्र शनिवारी रात्री भूकंपाच्या धक्क्याने हादरले. भूकंपाची तीव्रता ४.८ रिश्टर स्केल एवढी असून या भूकंपात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

शनिवारी रात्री 11 वाजून 44 मिनिटांनी सातारा, सांगली, कोल्हापूर हे जिल्हे भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी हादरले. भूकंपाची तीव्रता 4.8 रिश्टर स्केल होती. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणाच्या परिसरात असल्याचं सांगितलं जातं आहे.

गेल्या महिन्यातही कोयना धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. भूकंपाचे धक्के जाणवताचे काही भागांमध्ये नागरिक घाबरुन रस्त्यावर येऊन थांबले होते. या भूकंपामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

First published: June 4, 2017, 3:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading