मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आधी फक्त शासकीय कार्यालयावरच तिरंगा फडकवला जायचा, राज्यपालांचं मोठं विधान

आधी फक्त शासकीय कार्यालयावरच तिरंगा फडकवला जायचा, राज्यपालांचं मोठं विधान


आज घरोघरी तिरंगा अभियान उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधानांच्या आवाहनाला लोक उत्साहाने प्रतिसाद देत आहे. हे खूप आशादायी चित्र आहे

आज घरोघरी तिरंगा अभियान उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधानांच्या आवाहनाला लोक उत्साहाने प्रतिसाद देत आहे. हे खूप आशादायी चित्र आहे

आज घरोघरी तिरंगा अभियान उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधानांच्या आवाहनाला लोक उत्साहाने प्रतिसाद देत आहे. हे खूप आशादायी चित्र आहे

पुणे, 15 ऑगस्ट : 'तिरंगा हा काही कुठल्या पक्षाचा झेंडा नाही. हा तर तो आपल्या देशाचा राष्ट्रीय ध्वज आहे. नाहीतर यापूर्वी तिरंग्यावर अनेक बंधनं होती. फक्त सरकारी कार्यालयावरच ध्वजच फडकवला जायचा पण पंतप्रधानांनी आज हर घर तिरंगा अभियान राबवून सर्वांना तो अधिकार दिला' असं म्हणत राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (governor bhagat singh koshyari ) यांनी पंतप्रधान मोदींच्या (pm modi) हरघर तिरंगा मोहिमेचे तोंडभरून कौतुक केलं. पुण्यात जिल्हा परिषदेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या  हस्ते ध्वजारोहण आणि विविध कार्यक्रमांचे उद्घाटन आणि पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्यपालांनी पंतप्रधान मोदींच्या मोहिमेचं कौतुक केलं. आज घरोघरी तिरंगा अभियान उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधानांच्या आवाहनाला लोक उत्साहाने प्रतिसाद देत आहे. हे खूप आशादायी चित्र आहे कारण तिरंगा हा काही कुठल्या पक्षाचा झेंडा नाही. हा तर तो आपल्या देशाचा राष्ट्रीय ध्वज आहे. नाहीतर यापूर्वी तिरंग्यावर अनेक बंधनं होती. फक्त सरकारी कार्यालयावरच ध्वजच फडकवला जायचा पण पंतप्रधानांनी आज हर घर तिरंगा अभियान राबवून सर्वांना तो अधिकार दिला, असं म्हणत राज्यपालांनी पंतप्रधानांचं कौतुक केलं. (धक्कादायक! गुलाबराव पाटील ध्वजारोहण करत असतानाच महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न) 'मी पुढच्या वेळी झेडपी येईल तेव्हा आशा करतो लोकनियुक्त अध्यक्ष इथे बसलेले दिसतील. लोकशाहीला तेच शोभतं. निवडणुका लांबल्याने सध्या झेडपी अध्यक्ष नाहीत. प्रशासकच कारभार हाकत आहेत. हे आता मोबाईल क्रांतीचं युग आहे. पण पोस्टल डिपार्टमेंट महत्व अजूनही टिकून आहे. माजी झेडपी अध्यक्षांना स्टेजवर बसवलं असतं तरी चाललं असतं, अशी सूचनाच राज्यपालांची अधिकाऱ्यांना दिली. 'प्रधानमंत्री शासकीय योजनांचा निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पोहचवत असल्याने कधी कधी लोकप्रतिनिधी नाराज होतात, त्यांना वाटतं मग आम्हाला काय काम उरलं?  पण लाचखोरी थांबण्यासाठी हे आवश्यक आहे, असंही राज्यपाल म्हणाले. (भ्रष्टाचार आणि घराणेशाहीविरोधात लढण्यासाठी एकत्र या, लाल किल्ल्यावरून मोदींनी साधला काँग्रेसवर निशाणा) पंतप्रधानांना हा देश भ्रष्टाचार मुक्त करायचा आहे. अमृत महोत्सवानिमित्त भारताला आपल्याला विश्वगुरू बनवायचं आहे. पंतप्रधानांना आठ वर्ष झाली आहे. पण मंत्रिमंडळावर कधी भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही, असं म्हणत राज्यपालांनी पंतप्रधानांचं तोंडभरून कौतुक केलं.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या