आधी होते 200 रुपये दर,आता मोजावे लागताय 1500, हिंदू स्मशानभूमीत प्रकार

आधी होते 200 रुपये दर,आता मोजावे लागताय 1500, हिंदू स्मशानभूमीत प्रकार

100 वर्षे जुनी असलेल्या अमरावतीच्या हिंदू संस्थेच्या स्मशानभूमीत प्रमुख्याने अंत्यसंस्कार केले जातात.

  • Share this:

अमरावती, 30 सप्टेंबर : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. अमरावती जिल्ह्यातही कोरोनाची परिस्थिती गंभीर बनली आहे. परंतु, कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहावर स्मशानभूमीत लूट होत असल्याचे समोर आले आहे.

अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. कोरोनाने मृत्यूचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. 100 वर्षे जुनी असलेल्या अमरावतीच्या हिंदू  संस्थेच्या स्मशानभूमीत प्रमुख्याने अंत्यसंस्कार केले जातात. कोरोनाने मृत्यू झालेल्या शवावर हिंदू स्मशानभूमीत गॅस दाहीनित अंत्यसंस्कार केले जाते.

भीषण अपघात! शिवसेनेचे माजी खासदार मुकेश पटेल यांच्या मुलाचा जागीच मृत्यू

सुरुवातीला केवळ दोनशे रुपयांमध्ये हा अंत्यविधी केला जात होता. मात्र, आता हिंदू स्मशान संस्थेनं दोनशे रुपयांवरून  1500  रुपये शुल्क वाढवले आहे. या कोरोना काळात मृत्यूचे प्रमाण वाढल्याने रोज 25 ते 30 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. खर्च जास्त होत असल्याने हे शुल्क वाढवल्याच हिंदू स्मशान संस्थेच्या वतीने सांगण्यात येत आहे.

मात्र, कुणी मोफत अंत्यसंस्कार करण्याचे पत्र दिले तर त्या मृतदेहावर मोफत अंत्यसंस्कार करू असं हिंदू स्मशान संस्थेनं सांगितलं.

खरंतर या कोरोना काळात गेल्या सहा-सात महिन्यापासून सगळे व्यवसाय ठप्प आहेत. अनेक खासगी लोकांच्या नोकऱ्या देखील गेल्या आहेत. अशावेळी जेव्हा ज्या रुग्णाला कोरोना होतो. तेव्हा त्याच संपूर्ण कुटुंब मानसिक व आर्थिक दबावात येतो.

बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय, सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

अशावेळी खरंतर हिंदू स्मशान संस्थेने या कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार मोफत करायला पाहिजे पण त्यांनी मात्र दोनशे रुपये वरून 1500 रुपये अंत्यसंस्काराचे शुल्क वाढवल्याने सामाजिक कार्यकर्ते व सामान्य माणसांमध्ये नाराजीचा सूर आहे. हिंदू स्मशान संस्थेला अनेक देणगीदार देणग्या देतात. त्यामुळे किमान रुग्णांवर मोफत अंत्यसंस्कार करावे, अशी मागणी होत आहे.

Published by: sachin Salve
First published: September 30, 2020, 12:53 PM IST

ताज्या बातम्या