Home /News /maharashtra /

'...तर तुम्ही म्हणाल की मी गरिबाच्या थाळीवर ताव मारला', अजित पवारांच्या पत्रकारांना खोपरखळ्या

'...तर तुम्ही म्हणाल की मी गरिबाच्या थाळीवर ताव मारला', अजित पवारांच्या पत्रकारांना खोपरखळ्या

पुण्यात शिवभोजन थाळीचा आस्वाद घ्यायला पहिल्याच दिवशी रांग लागली.

    पुणे, 26 जानेवारी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात शिवभोजन योजनेचं उद्घाटन केलं. यावेळी पत्रकारांनी अजित पवार यांना थाळीतील जेवन खाण्याचा प्रयत्न केला. मात्र अजित पवार यांनी आपल्या मिश्किल अंदाजात नकार दिला. 'मी इथं जेवलो तर लगेच ब्रेकिंग न्यूज चालवाल तुम्ही की अजित पवार यांनी गरिबाच्या थाळीवर ताव मारला,' असं म्हणत अजित पवार यांनी पत्रकारांचीच फिरकी घेतली. पुण्यात शिवभोजन थाळीचा आस्वाद घ्यायला पहिल्याच दिवशी रांग लागली. 10 रुपयात रुचकर, स्वादिष्ट पोटभर जेवण मिळतंय अशी भावना व्यक्त करत नागरिकांनी स्वागत केलं. तर 'गरीब होतकरू कोण हे चेहऱ्यावरून कपड्यावरून ओळखणे कठीण आहे. जो येतो जेवायला त्याला नाही म्हणणं बरं दिसत नाही,' असे चालकाने प्रांजळपणे सांगितलं. अजित पवार यांनी पुणे पालिकेत निशिगंध कॅन्टीनमध्ये शिवभोजन योजनेचे उद्घाटन केले. 'निवडणूक पूर्व आश्वासन होते ते पूर्ण करत आहोत. गरीब होतकरू यांनी लाभ घ्यावा ज्यांची ऐपत त्यांनी लाभ घेऊ नये. नवी योजना आहे, त्यामुळे काही त्रुटी असतील. विरोधक टीका करणारच. आम्ही सकारात्मक रीतीने पाहतोय ते नकारात्मक पाहत आहेत,' असं अजित पवार यावेळी म्हणाले. एकनाथ खडसेंनी खोडून काढली शरद पवारांची भूमिका, भीमा कोरेगावबद्दल म्हणाले... शिवभोजन योजनेच्या उद्घाटनावेळी अजित पवार यांनी विचारलेल्या गमतीशीर प्रश्नांमुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं. 'हे कुणाचं हॉटेल आहे? इथं किती जणांना जेवण दिलं जातं? गरजू ,गरीब कसे ओळखणार? काही लोक मुद्दाम साधे कपडे घालून येतील...', असं म्हणत अजित पवार यांनी उद्घाटन करताना शिवभोजन योजनेच्या चालकांची चांगलीच फिरकी घेतली. यावेळी उत्तर देताना योजनेच्या चालकांची काहीशी भंबेरी उडाल्याचंही पाहायला मिळालं.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    पुढील बातम्या