अकोल्यात हवेचा दर्जा खराब, सरासरीपेक्षा धुळीचं प्रमाण 50 टक्क्यांनी जास्त

अकोल्यात हवेचा दर्जा खराब, सरासरीपेक्षा धुळीचं प्रमाण 50 टक्क्यांनी जास्त

अकोला शहरातील हवेत मानवी आरोग्य आणि पर्यावरणाला पूरक ठरणाऱ्या घटकांच्या प्रमाणाच्या तुलनेत तब्बल ५0 टक्के अधिक धूळ आहे. यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाने कृती आराखडा तयार करण्याचे बजावले.

  • Share this:

16 नोव्हेंबर : अकोला शहरातील हवेत मानवी आरोग्य आणि पर्यावरणाला पूरक ठरणाऱ्या घटकांच्या प्रमाणाच्या तुलनेत तब्बल ५0 टक्के अधिक धूळ आहे. यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाने कृती आराखडा तयार करण्याचे बजावले. मात्र ही धूळ आजूबाजूच्या गावातील असल्याचे  उत्तर महापालिकेचे आहे. हवेची गुणवत्ता खराब असलेल्या राज्यातील १७ शहरांमध्ये अकोल्याचा समावेश आहे.

अकोला शहरातील हवेची गुणवत्ता तपासणी विविध ठिकाणी केली जाते. पहाटेच्या काळातील हवेची गुणवत्ता पाहता त्यामध्येही धुळीचे प्रमाण प्रचंड आहे. त्यातून घशाचे आजार, डोळ्य़ांची जळजळ यासारखे आजार बळावतात. धुळीचा सर्वात घातक परिणाम लहान मुलांवर होतो. श्वसनातून हवेतील घटक थेट त्यांच्या शरीरात पोहचतात. तेथेच चिकटून राहतात. त्यामुळे फुप्फुसांवर परिणाम होतो.

शहरातील ही धूळ हटवण्यासाठी लागणारी मशीन घेण्याची महापालिका विचाराधीन आहे. मात्र, आजूबाजूच्या खेड्यांमधून हवेद्वारे धुळीचे कण शहरात येतात, हा महापालिकेचा नवा शोध आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 16, 2017 01:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading