नागपूर, 31 मार्च : नागपुरच्या सेंट्रल एव्हेन्युवर सुरू असणाऱ्या महामेट्रोच्या कामासाठी अजस्त्र लोखंडाचा भाग लावण्यात येत असतांना तो एका कारवर पडल्याने कारचा अक्षरशा चुराडा झालाय.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही.
आज पहाटे हा अपघात घडला. पहाटे हा अपघात झाला तेव्हा या परिसरात कुणीही नसल्याने जिवितहानी झाली नाही पण कार आणि पोलचे मोठे नुकसान झाले आहे. हे काम सुरू होत त्यावेळेस वाहतूक बंद केली होती. मात्र ही कार पार्क केली असल्याने ती हटवला आली नाही. त्यामुळे त्यावर हा जीएसएसचा लोखंडी भाग लावतांना निसटल्याने अपघात झाल्याचं महामेट्रोनं सांगितलंय.
दरम्यान, या कारमालकाला पूर्ण नुकसान भरपाई महामेट्रो देणार असल्याचंही मेट्रोच्या वतीने सांगण्यात आलंय. नागपुरात ज्या ठिकाणी मेट्रोचे काम सुरू आहे त्या ठिकाणी वाहतुक सुरू असतांना कुठलेही अजस्त्र सामानांची वाहतूक करू नये अशा सुचना कंत्राटदारांना देण्यात आल्या असून त्या न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणारं असल्याचं महामेट्रोनं सांगितलंय.
तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.