काँग्रेसच्या काळात हेडगेवारांनी गोवंश हत्याबंदीचा ठराव मांडला होता-भागवत

काँग्रेसच्या काळात हेडगेवारांनी गोवंश हत्याबंदीचा ठराव मांडला होता-भागवत

काँग्रेसच्या १९२० च्या नागपूरच्या अधिवेशनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डाॅ.केशव बळीराम हेडगेवार यांनी देशात संपूर्ण गोवंश हत्या बंदीचा ठराव मांडला होता

  • Share this:

08 जून : महात्मा गांधी काँग्रेसचे अध्यक्ष असतांना १९२० च्या काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनात हेडगेवारांनी संपूर्ण गोवंश हत्येचा ठराव मांडला होता असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीया शिक्षा वर्गाच्या समारोपाचा कार्यक्रम नागपूरच्या रेशिमबाग मैदानावर आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात मोहन भागवत यांनी गोवंश हत्याबंदीवर भाष्य केलं.

काँग्रेसच्या १९२० च्या नागपूरच्या अधिवेशनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डाॅ.केशव बळीराम हेडगेवार यांनी देशात संपूर्ण गोवंश हत्या बंदीचा ठराव मांडला होता असं संघाचं सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितलंय.

महात्मा गांधी अध्यक्ष असतांना हेडगेवार यांच्याकडे काँग्रेसच्या अधिवेशनाच्या आयोजनाची जबाबदारी होती. या अधिवेशनाच्या नियामक समितीपुढे दोन प्रस्ताव हेडगेवारांनी मांडले होते त्यात संपुर्ण गोवंश हत्याबंदी करण्याचाही प्रस्ताव असल्याचं मोहन भागवत यांनी सांगितलंय.

तसंच भारत आणि हिंदू हे दोघांचही अस्तित्व एकमेकांशिवाय नाही आणि हिंदू कुठल्याही पुजेचे नाव नाही असंही भागवत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 8, 2017 10:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading