आरोपातून मुक्त झाल्यामुळे एकनाथ खडसे यांची कार्यकर्त्यांनी केली आंबा तुला

आरोपातून मुक्त झाल्यामुळे एकनाथ खडसे यांची कार्यकर्त्यांनी केली आंबा तुला

भ्रष्टाचारासह विविध प्रकारच्या आरोपातून मुक्त झालेल्या एकनाथ खडसे यांची कार्यकर्त्यांनी आंब्यांनी तुला केली.

  • Share this:

13 मे : भ्रष्टाचारासह विविध प्रकारच्या आरोपातून मुक्त झालेल्या एकनाथ खडसे यांची कार्यकर्त्यांनी आंब्यांनी तुला केली. आंब्यांची तुला केल्याने खडसे चांगलेच भारावून गेले होते. खडसे यांच्यावर मे 2016 मध्ये आरोप झाले होते.

जमीन गैरव्यवहार, दाऊदशी संबंध, जावयाची हाय-फाय गाडी, पी.ए. ने घेतलेली लाच असे अनेक आरोप खडसे यांच्यावर करण्यात आले होते. मात्र लाचलुचपत विभागाच्या अहवालात खडसे निर्दोष आढळल आहेत. आरोप 2016मध्ये झाल्याने खडसे यांची सोळाशे आंब्यांनी तुला करण्यात आली.

कार्यकर्त्यांच्या या आंबे तुला सोहळ्याने एकनाथ खडसे देखील आज भाराऊन गेल्याचे पहायला मिळाले. त्याच बरोबर आपली स्नुषा खासदार रक्षा खडसे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कार्यकर्त्यांनी आंबा तुला केली असल्याचे खडसे यांनी सांगितलं आहे.

आपले १६०० आंब्याचे या ठिकाणी झाड असून मतदार संघातील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित असल्याने त्यांचे प्रेम पाहून आपण भाराऊन गेलो आहोत. या तथ्यहीन आरोपांमधून आपण नक्कीच बाहेर येऊ असा विश्वास वाटतो अशी प्रतिक्रिया माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आंबे तुला केल्या प्रसंगी व्यक्त केली आहे.

 

First published: May 13, 2018, 7:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading