Home /News /maharashtra /

शाहू महाराजांच्या प्रतिक्रियेमुळे फडणवीस खोटे ठरले, राऊतांचा सणसणीत टोला

शाहू महाराजांच्या प्रतिक्रियेमुळे फडणवीस खोटे ठरले, राऊतांचा सणसणीत टोला

 'शिवसेनेने कोणाची फसवणूक केली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीराजे यांची ठरवून कोंडी केली असे विधान केले होते

'शिवसेनेने कोणाची फसवणूक केली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीराजे यांची ठरवून कोंडी केली असे विधान केले होते

'शिवसेनेने कोणाची फसवणूक केली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीराजे यांची ठरवून कोंडी केली असे विधान केले होते

    कोल्हापूर, 28 मे : राज्यसभेसाठी पाठिंबा न दिल्यामुळे संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati)  यांनी शिवसेनेवर टीका केली होती. पण  संभाजीराजेंना उमेदवारी डावलणे म्हणजे छत्रपती घराण्याचा अपमान झाल्याचं बोलल जात होतं मात्र खुद्द संभाजीराजेंच्या वडिलांनीच (Shahu Maharaj) यावर प्रतिक्रिया दिली असून राजघराण्याचा अपमान झाला नसल्याचे म्हटलं आहे. यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी देवेंद्र फडणवीसांचे (devendra fadanvis) विधान खोटं होत हे शाहू महाराज यांच्या विधानाने स्पष्ट झाले, अशी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती घराण्याचे कोल्हापूर गादीचे वंशज शाहू महाराजांनी आपले पुत्र युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे उघडपणे कान टोचले आहेत. यावर संजय राऊत यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 'शाहू महाराज यांनी आज भूमिका व्यक्त केली, त्यानंतर भाजपने जो संभ्रम निर्माण केला तो दूर झाला, मात्र त्यांच्या विधानाने तो दूर झाला. कोल्हापूरच्या मातीत सत्य आणि प्रामाणिक पणाची कास सोडली नाही. आजही शाहू महाराजांच्या विचारासमोर महाराष्ट्र झुकतो. त्यांच्या वंशजांनी सत्याची कास सोडली नाही, मी त्यांना भेटून त्यांचा आशीर्वाद घेणार आहे, असं राऊत म्हणाले. (कोणते आहेत रणदीप हूडासारखे आणखी 11 underrated बॉलिवूड अभिनेते?) 'शिवसेनेने कोणाची फसवणूक केली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीराजे यांची ठरवून कोंडी केली असे विधान केले होते. पण आता देवेंद्र फडणवीसांचे विधान खोटं होत हे शाहू महाराज यांच्या विधानाने स्पष्ट झाले, असा टोला राऊत यांनी फडणवीसांना लगावला. शाहू महाराज यांचा अनुभव दांडगा आहे.  बाळासाहेब ठाकरे यांचा छत्रपती शाहू महाराजांचा निकटचा स्नेह मिळाला आहे. ठाकरे आणि छत्रपतीचा स्नेह काय आहे, हे या निमित्ताने मिळाला आहे. शिवसेनेने खालच्या पातळीचे राजकारण कधी केले नाही, असंही राऊत म्हणाले. शाहू महाराज नेमकं काय म्हणाले? छत्रपती घराण्याचे कोल्हापूर गादीचे वंशज शाहू महाराजांनी (Shahu Maharaj) आपले पुत्र युवराज संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांचे उघडपणे कान टोचले आहेत. संभाजीराजेंनी स्वराज्य (Swarajya) नावाच्या स्वतंत्र संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेचं रुपांतर भविष्यात पक्षातही होऊ शकतो, असा संकेतही त्यांनी दिला आहे. याशिवाय संभाजीराजेंनी काल पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (CM Uddhav Thackeray) टीका केली होती. संभाजीराजेंच्या या सर्व कृतीवर त्यांचे वडील शाहू महाराजांनी नाराजी व्यक्त केली आहे. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करणं, किंवा स्वतंत्र पक्ष काढणं योग्य नसल्याचं शाहू महाराज म्हणाले आहेत. (नाशिकच्या या गावात तब्बल 50 वर्षांपासून पाण्याची सोय नाही! नागरिक आले रस्त्यावर) "मुख्यमंत्र्यांनी युटर्न घेतला. त्यांनी शब्द पाळला नाही", असे आरोप संभाजीराजेंनी केले होते. ते आरोप बरोबर नाहीत, अशी प्रतिक्रिया शाहू महाराजांनी दिली आहे. शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यात जो ड्राफ्ट तयार झाला होता तो कच्चा ड्राफ्ट होता, असा दावा शाहू महाराजांनी केला. "हा छत्रपती घराण्याचा अपमान नव्हे. तर मुळात संभाजीराजेंनी पक्ष घोषित करणं हे सुद्धा चुकीचं होतं", असं म्हणत शाहू महाराजांनी संभाजीराजे छत्रपती यांचे कान टोचले आहेत.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या