बीड, 12 नोव्हेंबर : महावितरण (MSEDCL ) च्या गलथान कारभारामुळे येन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांचा 20 एक्कर ऊस जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना बीड (Beed) जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात घडली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुले तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
गेवराई तालुक्यातील मिरगाव इथं बुधवारी दुपारी ही घटना घडली आहे. शेतात महावितरणचे खांब लावण्यात आले आहे. दुपारच्या वेळी अचानक दोन तारांमध्ये संपर्क झाला त्यामुळे ठिणगी उडाल्या होत्या. विद्युत तारेवरची ठिणगी उसाच्या फडात पडली. त्यामुळे काही कळायच्या आता उसाच्या शेतीला आग लागली. बघता बघता आगीने प्रचंड रौद्ररुपधारण केले. आगीमध्ये 20 एकरावरील ऊस शेती भस्मस्थानी सापडली.अक्षरशः उभा 20 एकरातील ऊस जळून खाक झाला आहे.
अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीकडून पदवीधरसाठी उमेदवार जाहीर,'या' दोन नावाची घोषणा
उसाला आग लागलेली पाहताच शेतकऱ्यांनी जीवाच्या आकांताने धाव घेतली आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण, यात त्यांना यश आले नाही. मोठ्या मेहनतीने अस्मानी संकटाचा सामना करून घेतले उसाचे पिक डोळ्यासमोर जळून खाक झाले. दिवाळी सणाच्या तोंडावर ऊस जळून खाक झाल्यामुळे शेतकऱ्यांचा अश्रूचा बांध फुटला.
यात दुर्घटनेत शेतकरी भारत शंकर दातवासे, अर्जुन शंकर दातवासे, भीमराव शंकर दातवासे, नारायण दातवासे, भागवत आखरे, मुक्ताबाई खूपसे, लक्ष्मण आखरे या शेतकऱ्यांचा 20 एकर ऊस जळून खाक झाला.
'चूक शोधा', राष्ट्रवादी सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या नेत्याचा पक्षालाच घरचा अहेर
दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्याचे नुकसान झाले असून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ 1 लाख रुपये एकरने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी, स्वाभिमानी युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांनी केली आहे.