संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना 'अमूल'चा दिलासा.. दूध खरेदी दरात वाढ

संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना 'अमूल'चा दिलासा.. दूध खरेदी दरात वाढ

अमूल दूध संघाकडून गाय आणि म्हैसच्या दूध खरेदी दरात चालू हंगामात तिसऱ्यांदा दरवाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्रातीस दुष्काळस्थिती पाहता दूध संघाने दूध खरेदी दरात वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

मुंबई, 11 जून- अमूल दूध संघाकडून गाय आणि म्हैसच्या दूध खरेदी दरात चालू हंगामात तिसऱ्यांदा दरवाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्रातीस दुष्काळस्थिती पाहता दूध संघाने दूध खरेदी दरात वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. अमूलने 10 एप्रिल, 25 एप्रिल आणि 11 जून दरम्यान दूध खरेदी दरात वाढ केली. दूधाच्या दरात तब्बल 5 रुपयांची भरघोस खरेदी दरवाढ करत अमूलने दूध खरेदी दरात मोठी स्पर्धा निर्माण केली आहे. 10 एप्रिल ते आजपर्यंत एकूण 5 रुपयांची वाढ दिली आहे. नव्या दरानुसार गायीचे दूध प्रतिलिटर 27 रुपये तर म्हैसचे दूध 40.50 पैसे दराने खरेदी करण्यात येणार आहे.

अमूलच्या या निर्णयाने दूध खरेदी दराची स्पर्धा वाढणार आहे. पर्यायाने दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. अमूलची दूध दरवाढ महाराष्ट्रसगह गुजरात राज्यात 11 जूनपासून लागू करण्यात येणार आहे. अमूलच्या दरवाढीने गोकूलसह राज्यातल्या सर्वच संघांना दर खरेदीच्या दरात वाढ करण्यासाठी दबाव राहणार आहे.

या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा..

सातारा, पुणे, ठाणे, पालघर आणि नाशिक या 5 जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून अमूलकडून दूध खरेदी केली जाते. अमूल दूध संघाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

नफ्यातून शेतकऱ्यांना लाभ देणार..

अमूलने 10 एप्रिल ते आजपर्यंत दूध खरेदीच्या दरात एकूण 5 रुपयांची वाढ दिली आहे. संघ हा पैसा दुष्काळ दिलासा म्हणून नफ्यातून देणार आहे. ग्राहकांची दरवाढ यापूर्वीच झाली आहे. बहुतेक याचा ग्राहकांवर ताण येऊ देणार नाही, असेही संघाने सांगिलले आहे. आजचा निर्णय दूध उत्पादकाच्या दृष्टीने घेण्यात आला आहे.

दरम्यान, 'अमूल'ने मागील काही दिवसांपूर्वी दूधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. दूधाच्या दरात 21 मेपासून दोन रुपयांनी वाढ करण्यात आली होती. गुजरात को-ऑपरेटीव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे (GCMMF)संचालक आर. एस. सोधी यांनी दूध दरवाढीबाबतची माहिती दिली होती. यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडले आहे. यापूर्वीही, अमूल कंपनीनं दुधाच्या दरामध्ये वाढ केली होती. आर्थिक संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने 'अमूल'ने दूध खरेदी दरात 10 रुपयांनी वाढ केली होती. कंपनीच्या या निर्णयामुळे अमूल डेअरीशी संलग्न असणाऱ्या 1,200 दूध संघटनांमधील सात लाख शेतकऱ्यांना याचा लाभ झाला होता.

भर रस्त्यात जावयावर सपासप वार, VIDEO व्हायरल

First published: June 11, 2019, 1:31 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading